चालू घडामोडी – एप्रिल २०२१

३० एप्रिल

 • रोहित सरदाना; गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कृत भारतीय पत्रकार यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १९७९)
 • के. व्ही. आनंद; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते भारतीय चित्रपट लेखक, दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १९६६)
 • सोली सोराजी; पद्मा विभूषण पुरस्कृत भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अॅटर्नी जनरल यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९३०)
 • चंद्रो तोमर; उर्फ शूटर दादी; भारतीय शार्पशुटर यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९३२)

२९ एप्रिल

 • रियाझ अहमद; भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९५८)
 • सी. अरंगनायगम; भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे आमदार यांचे निधन. (जन्म: १६ जानेवारी १९३१)
 • राजेंद्रसिंह बघेल; भारतीय राजकारणी, मध्य प्रदेशचे आमदार यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९४५)
 • कुंवर बेचेन; भारतीय कवी यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९४२)
 • लक्ष्मण गिलुवा; भारतीय राजकारणी, झारखंडचे खासदार यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९६४)

 

 

२८ एप्रिल

 • गुवाहाटी आसाम पासून १४० किलोमीटर अंतरावर ६.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप, याचा परिमाण भारतासह म्यानमार, भूतान, बांग्लादेश आणि चीन या देशांमध्ये सुद्धा झाला.
 • अनिश देब; भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९५१)
 • एकनाथ गायकवाड; भारतीय राजकारणी, महाराष्ट्रचे खासदार आणि आमदार यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९४०)
 • जनार्दनसिंग गेहलोत, आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे संस्थापक यांचे निधन.

२७ एप्रिल

 • मार्गघुब बनिहाली; साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय कवी यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९३७)
 • सिडनल शानमुखप्पा बसप्पा; भारतीय राजकारणी, कर्नाटकचे खासदार यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९३६)
 • मनोज दास; पद्मश्री, पद्म भूषण, साहित्य अकादमी फेलोशिप विजेते भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १९४३)
 • एन.एस. मोहन; भारतीय चित्रपट निर्माते यांचे निधन.
 • लीला नंबुडीरीपाद; भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: १६ मे १९३४)
 • रामेश्वर पाटीदार; भारतीय राजकारणी, मध्य प्रदेशचे खासदार यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९३८)
 • करुणा शुक्ला; भारतीय राजकारणी, मध्य प्रदेशच्या खासदार यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९५०)
 • थामिरा; भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.

 

 

२६ एप्रिल

 • कोव्हिड-१९ महामारी: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करताना महाराष्ट्रात ५ लाखाहून अधिक लसी देण्यात आल्या. हा एक राष्ट्रीय विक्रमी आकडा आहे.
 • सुग्रीब सिंग; भारतीय राजकारणी, ओरिसाचे खासदार यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९६३)
 • रामू; भारतीय चित्रपट निर्माते यांचे निधन.
 • जगदीश खट्टर; मारुती सुझुकी कंपनीचे प्रबंध संचालक, कार्नेशन ऑटोचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १९४२)
 • दादूदन गढवी; पद्मश्री पुरस्कृत भारतीय कवी यांचे निधन. (जन्म: १९४१)
 • राव धरमपाल; भारतीय राजकारणी, हरयाणाचे आमदार यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १९४२)
 • वामन भोसले; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते भारतीय चित्रपट संपादक यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १९३२)
 • साई बालाजी; भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.
 • मंजूर अहतेशम; पद्मश्री पुरस्कृत भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९४८)

२५ एप्रिल

 • मोहन शांतानगौदर; भारतीय न्यायशास्त्रज्ञ, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचे निधन. (जन्म: ५ मे १९५८)
 • पॉत्ती विरया; भारतीय अभिनेते, विनोदकार यांचे निधन. (जन्म: १९४७)
 • राजन मिश्रा; पद्मभूषण पुरस्कृत भारतीय ख्याल संगीतकार यांचे निधन. (जन्म: १९५१)

२४ एप्रिल

 • अश्विन यादव; भारतीय क्रिकेटर यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १९८७)
 • दरियाव खटीक; भारतीय राजकारणी, हरियाणाचे आमदार यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९५०)
 • कलावती बहुरिया; भारतीय राजकारणी, मध्य प्रदेशच्या आमदार यांचे निधन. (जन्म: १९७२)

 

 

२३ एप्रिल

 • कोव्हीड-१९ महामारी: ८० कोटी लोकांना ५ किलो मोफत अन्नधान्य देण्यास भारत सरकारचा पुढाकार, या साठी खर्च करणार २६,००० कोटी.
 • अमित मिस्त्री; भारतीय अभिनेते यांचे निधन.
 • अरुण निगावेकर; भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि शिक्षक, राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदचे (एनएएसी) संस्थापक संचालक यांचे निधन. (जन्म: १४ मार्च १९४२)

२२ एप्रिल

 • पुरुषोत्तम नरेश द्विवेदी; भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार यांचे निधन.
 • श्रावण राठोड; भारतीय चित्रपट संगीतकार यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९५४)
 • अशोक कुमार वालिया; भारतीय राजकारणी, दिल्लीचे आमदार यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १९४८)

२१ एप्रिल

 • कोव्हीड-१९ महामारी:२४ तासात भारतामध्ये ३,५१,००० रुग्ण संसर्ग झाल्याने आजपर्यंत जगात नोंदवलेला उचांक आहे.
 • नाशिक ऑक्सिजन वायू गळती: नाशिक मध्ये झालेल्या ऑक्सिजन वायूगळती मुळे किमान २४ रुग्णांचा मृत्यू.
 • शंखा घोष; पद्मश्री, ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय कवी आणि साहित्यिक समीक्षक यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९३२)
 • वहीदुद्दीन खान; भारतीय इस्लामिक विद्वान आणि शांतता कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९२५)

 

 

२० एप्रिल

 • श्याम बिहारी मिश्रा; भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे खासदार यांचे निधन. (जन्म: ८ मे १९३८)
 • किशोर नंदलास्कर; भारतीय विनोदी अभिनेते यांचे निधन.
 • एम. नरसिम्हम; भारतीय अर्थशास्त्रज्ञ, भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे १३वे गव्हर्नर यांचे निधन. (जन्म: ३ जून १९२७)

१९ एप्रिल

 • नासाच्या इंगेनुंती हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावर उड्डाण केले. हे दुसर्‍या ग्रहावर मानवनिर्मित उडालेले इतिहासातील पहिले विमान आहे.
 • सुमित्रा भावे; भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९४३)
 • मेवालालाल चौधरी; भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९५३)
 • श्याम देहाती; भारतीय भोजपुरी गीतकार यांचे निधन.
 • जगदीशसिंग राणा; भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे खासदार यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९५४)
 • गोपाळ कृष्णा सक्सेना; भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९५१)
 • जी. वेंकटसूसबीया; पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार पुरस्कृत भारतीय शब्दकोषागार यांचे निधन. (जन्म: २३ ऑगस्ट १९१३)

 

 

१८ एप्रिल

 • भूमीधर बर्मन; भारतीय राजकारणी, आसामचे १२वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९३१)
 • अच्युत माधव गोखले; पद्मश्री पुरस्कृत भारतीय नागरी सेवक अधिकारी यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९४६)
 • ज्योती कलानी; भारतीय राजकारणी, महाराष्ट्राच्या आमदार यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १९५१)
 • बची सिंग रावत; भारतीय राजकारणी, उत्तराखंडचे खासदार यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९४९)
 • ल्यूकास सिरकर; भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट यांचे निधन.

१७ एप्रिल

 • कोविड -१९ महामारी: जागतिक मृत्यूची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त.
 • नरेंद्र कोहली; पद्मश्री पुरस्कृत भारतीय कादंबरीकार आणि शैक्षणिक समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १९४०)
 • बीर सिंग महतो; भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे खासदार यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १९४५)
 • मनोज कुमार मुखर्जी; भारतीय न्यायशास्त्रज्ञ, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९३३)
 • विवेक; पद्मश्री पुरस्कृत भारतीय अभिनेते, तामिळ चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९६१)

 

 

१६ एप्रिल

 • हुसेन अहमद; भारतीय ऑलिम्पिक फुटबॉलर यांचे निधन. (जन्म: १९३२)
 • काकरला सुब्बा राव; पद्मश्री पुरस्कृत भारतीय रेडिओलॉजिस्ट यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १९२५)
 • रणजित सिन्हा; भारतीय पोलिस अधिकारी, केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १९५३)

१५ एप्रिल

 • अजमीरा चंदूलाल; भारतीय राजकारणी, तेलंगणाचे आमदार यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १९५३)

१३ एप्रिल

 • सायमन मरांडी; भारतीय राजकारणी, झारखंडचे आमदार यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९४७)

१२ एप्रिल

 • कुंजा बोगजी; भारतीय राजकारणी, आंध्र प्रदेशचे आमदार यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९२५)
 • धनारे पासकाल जान्या; भारतीय राजकारणी, महाराष्ट्रचे आमदार यांचे निधन.
 • योगेश प्रवीण; पद्मश्री पुरस्कृत भारतीय इतिहासकार यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १९३८)

११ एप्रिल

 • के. थिप्पेस्वामी; भारतीय राजकारणी, आंध्र प्रदेशचे आमदार यांचे निधन.

१० एप्रिल 

 • सतीश कौल; भारतीय अभिनेते यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९४६)

 

 

९ एप्रिल

 • रावसाहेब अंतापूरकर; भारतीय राजकारणी, महाराष्ट्रचे आमदार यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९५८)
 • श्यामा चरण गुप्ता; भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे खासदार यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९४५)
 • डीएमएक्स; अमेरिकन संगीतकार आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १९७०)
 • महेश जोशी; भारतीय राजकारणी, मध्य प्रदेशचे आमदार यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १९४९)
 • प्रिन्स फिलिप, ड्यूक ऑफ एडिनबर्ग; ग्रीक-जन्मलेल्या ब्रिटीश रॉयल कॉन्सर्ट यांचे निधन. (जन्म: १० जून १९२१)

८ एप्रिल

 • रियाझ पंजाबी; पद्मश्री पुरस्कृत भारतीय शैक्षणिक प्रशासक यांचे निधन.

६ एप्रिल

 • प्रथिमा देव; भारतीय कन्नड अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १९३३)
 • के. ए. सिद्दीक हसन; भारतीय विद्वान यांचे निधन. (जन्म: ५ मे १९४५)
 • फातिमा जकारिया; भारतीय पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १९३६)

५ एप्रिल

 • पी. बालाचंद्रन; भारतीय अभिनेते यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९५२)

 

 

४ एप्रिल

 • सरोजा वादळामुळे इंडोनेशिया मधील १६७ आणि पूर्व तैमोरमधील ४२ लोकांचा मृत्यू.
 • खलील धनतेजवी; भारतीय गुजराथी कवी यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९३५)
 • दिग्विजयसिंहजी झाला; भारतीय राजकारणी, गुजरातचे खासदार यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट १९३२)
 • रॉबर्ट मुंडेल; नोबेल पारितोषिक विजेते कॅनेडियन अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९३२)
 • शशिकला; भारतीय अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९३२)
 • भगवती सिंग; भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशच्या खासदार यांचे निधन.

३ एप्रिल

 • २०२१ सुकमा-विजापूर हल्ला:  छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यामध्ये भारतीय सुरक्षा दलाच्या विरोधात नक्षलवादी-माओवादी बंडखोरांनी हल्ला केल्यामुळे २२ सुरक्षा कर्मचारी आणि ९ नक्षलवादी ठार झाले.
 • टाकाशी अझुमा; जपानी मार्शल आर्टिस्ट, कुडो मार्शियल आर्टचे संस्थापक यांचे निधन.
 • मेहली इराणी; भारतीय क्रिकेटर यांचे निधन. (जन्म: २६ जुन १९३०)
 • वली रहमानी; भारतीय इस्लामिक विद्वान आणि राजकारणी, रहमानी३० चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: ५ जून १९४३)
 • तारिक शाह; भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.

१ एप्रिल

 • इसामु अकासाकी; नोबेल पारितोषिक विजेते जपानी भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२९)
 • चंद्रनाथ मिश्रा अमर; साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय लेखक आणि कवी यांचे निधन. (जन्म: २ मार्च १९२५)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.