जानकीदेवीं बजाज

जानकीदेवीं बजाज

जन्म: ७ जानेवारी १८९३ – निधन: २१ मे १९७९

जानकीदेवीं बजाज ह्या स्वातंत्र्य वीरांगना होत्या. गोसेवा आणि हरिजनांच्या जीवनाची आणि त्यांच्या मंदिरातील प्रवेशासाठी १९२८ मध्ये त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले. तसेच त्यांनी खादी बनवण्यासाठी चरखा सुद्धा चालवला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी भूदान चळवळीमध्ये विनोबा भावे यांच्याबरोबर काम केले. १९४२ पासून अखिल भारतीय गोसेवा संघाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी बरेच वर्ष काम केले. त्यांच्या या योगदानासाठीच १९५६ मध्ये त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मविभूषण’ प्रदान करण्यात आला. १९६५ मध्ये त्यांनी ‘मेरी जीवन यात्रा’ नावाने आत्मचरित्र प्रकाशित केले.