मन्सूर अली खान पतौडी

Mansoor Ali Khan Pataudi

मन्सूर अली खान पतौडी

जन्म: ५ जानेवारी १९४१ – निधन: २२ सप्टेंबर २०११

नवाब मोहम्मद मन्सूर अली खान सिद्दीकी पतौडी उर्फ टायगर पतौडी हे ९वे पतौडी नवाब होते. तसेच ते भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुद्धा होते. वयाच्या २१ व्या वर्षीच त्यांना भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार बनवण्यात आले होते. त्यामुळेच त्याचे नाव भारताच्या महान क्रिकेट कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तसेच पतौडी यांना त्यांच्या काळातीळ ‘जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक’ (फिएल्डर) देखील म्हटले जात असे. त्यांना खेडाळुनसाठी दिला जाणारा अर्जुना पुरस्कार आणि चौथा सर्वोच्च पुरस्कार ‘पद्मश्री’ सुद्धा देण्यात आला आहे.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.