राकेश शर्मा

Rakesh Sharma

राकेश शर्मा

जन्म: १३ जानेवारी १९४९

विंग कमांडर राकेश शर्मा हे भारतीय वायुसेनेचे माजी पायलट होते. तसेच पहिले अंतराळवीर जे भारताचे नागरिक आहेत. २ एप्रिल १९८४ रोजी सोयुज टी – ११ सोव्हिएत इंटरकोसमॉस या कार्यक्रमाद्वारे त्यांनी अंतराळ प्रवास केला. तब्बल ७ दिवस २१ तास ४० मिनिटे ते अंतराळ राहिले. त्या दरम्यान त्यांनी एकूण ४३ वैज्ञानिक आणि तांत्रिक अभ्यास केलेत. भारतातील सर्वोच्च शांततामय सैनिकी (युद्धावैतिरिक्त) सन्मान ‘अशोक चक्र’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच ‘हिरो ऑफ द सोव्हिएत युनियन’ हा पुरस्कार मिळवणारे ते आज पर्यंतचे एकमेव भारतीय आहेत.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.