१ जानेवारी घटना - दिनविशेष


२०२२: रिजनल कॉमप्रेहेंसीव इकनॉमिक पार्टनरशीप - (Regional Comprehensive Economic Partnership) हा ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, न्यूझीलंड, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या आशिया-पॅसिफिक राष्ट्रांमधील मुक्त व्यापार करार असून, जगातील सर्वात मोठा व्यापार गट तयार झाला.
१९३२: सकाळ वृत्तपत्र - डॉ. नारायण परुळेकर यांनी सुरु केले.
१९२३: स्वराज्य पार्टी - चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापना केली.
१९०८: ललित कलादर्श - संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे नाटक कंपनी स्थापन केली.
१९००: मित्रमेळा - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापना केली.
१८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
१८८३: नूतन मराठी विद्यालय, पुणे - स्थापना.
१८८०: न्यू इंग्लिश स्कूल, पुणे - विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी स्थापना केली.
१८६२: इंडियन पिनल कोड - सुरवात.
१८४८: महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.
१८१८: भीमा कोरेगावची लढाई - बाजी राव पेशवा (दुसरे) आणि दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियन मधल्या लढाईला मराठ्यांचा पराभव.
१८०८: अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
१७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024