२०२२:राफेल नदाल— यांनी १४वे फ्रेंच ओपन आणि कारकिर्दीतील विक्रमी २२वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले
२०२२:— चार धाम यात्रेला जात असलेली बस उत्तरकाशीमध्ये दरीत कोसळल्याने १५ लोकांचे निधन तर ६ जखमी.
२०१५:— मलेशिया देशात झालेल्या ६.० रेक्टर तीव्रतेच्या भूकंपाने रानौ, सबा, मलेशियात मोठ्या प्रमाणात भूस्खलनानंतर माउंट किनाबालूवर हायकर्स आणि माउंटन गाइड्ससह १८ लोकांचे निधन.
२००४:— फ्रान्समध्ये प्रथमच दोन पुरुषांचा समलिंगी विवाह साजरा झाला.
२००३:— पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.
२००१:उष्णकटिबंधीय वादळ एलिसन (Tropical Strom Alison)— अमेरिकेतील दुसरे सगळ्यात मोठे वादळ, यात किमान ५५० करोड डॉलर्स पेक्षा जास्त नुकसान.
१९९७:काँगो— देशात दुसरे प्रजासत्ताक राष्ट्रीय युद्ध सुरू झाले.
१९९५:बोस-आईनस्टाईन कंडेन्सेट— पहिल्यांदा तयार केले गेले.
१९९४:ब्रायन लारा— यांनी नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
१९८४:ऑपरेशन ब्लू स्टार— सुवर्णमंदिर, अमृतसर मध्ये घुसलेल्या अतिरेक्यांवर भारतीय सेनेने हल्ला केला.
१९८१:एड्स रोग— पहिल्यांदा एड्सची लक्षणे असणारे रुग्ण अमेरिकेत सापडले.
१९८०:— भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
१९७७:सिशेल्स— देशात उठाव झाला.
१९७५:सुएझ कालवा— पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.
१९६७:— इस्रायलच्या सीमेवर इजिप्शियन सैन्याच्या जमावाला प्रतिसाद म्हणून इस्रायलने इजिप्शियन हवाई क्षेत्रांवर अचानक हल्ले केले.
१९५९:सिंगापूर— देशात पहिल्या सरकारची स्थापना झाली.
१९४९:ओरापिन चैयाकन— यांची थायलंड देशामध्ये संसदेच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून निवड झाली.
१९४७:शीतयुद्ध— मार्शल योजना: अमेरिकेच्या राज्य सचिवांनी युद्धग्रस्त युरोपला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
१९४५:मित्रपक्ष नियंत्रण परिषद (Allied Control Council)— औपचारिकपणे जर्मनीच्या सत्तेवर आली.
१९४४:दुसरे महायुद्ध— डी-डे: १ हजार हून अधिक ब्रिटीश बॉम्बर्सनी नॉर्मंडी किनाऱ्यावर जर्मन तोफांच्या बॅटरीवर ५ हजार टन बॉम्ब टाकले.
१९४३:दुसरे महायुद्ध— अमेरिकेने बल्गेरिया, हंगेरी आणि रोमानियावर युद्ध घोषित केले.
१९४१:दुसरे महायुद्ध— चोंगकिंग बॉम्बस्फोट: या बॉम्बहल्ल्यामुळे ४ हजार चोंगकिंग रहिवासी गुदमरले.