१२ जून घटना - दिनविशेष

  • जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन

२०१४: इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.
२००१: कोनेरु हंपी - या बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारतातील सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू आहेत.
१९९६: एच. डी. देवेगौडा - यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
१९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
१९९१: बोरिस येल्तसिन - यांची रशियाचे पहिले अध्यक्ष म्हणून लोकशाही पद्धतीने निवड.
१९९०: रशिया दिन - रशियन फेडरेशनच्या संसदेने औपचारिकपणे त्याचे सार्वभौमत्व घोषित केले.
१९७५: इंदिरा गांधी - अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
१९६४: नेल्सन मंडेला - यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
१९४४: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन ओव्हरलॉर्ड: अमेरिकन पॅराट्रूपर्सनी कॅरेंटन, नॉर्मंडी, फ्रान्स शहर सुरक्षित केले.
१९४३: होलोकॉस्ट - जर्मनीच्या सैन्याने पोलंडमधील ब्रझेझनी येथील ज्यू वस्ती नष्ट केली. सुमारे ११८० ज्यूं लोकांची हत्या करण्यात आली.
१९४२: ऍन फ्रॅंक - यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.
१९४०: दुसरे महायुद्ध - १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
१९४०: दुसरे महायुद्ध - १३ हजार ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याने मेजर जनरल एर्विन रोमेल यांच्याकडे आत्मसमर्पण केले.
१९३५: चाको युद्ध - बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.
१९०५: भारत सेवक समाजाची (Servants of India Society) - स्थापना झाली.
१८९८: फिलिपाइन्स - देशाने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१८९६: जे.टी. हर्न - प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू बनले.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024