१३ जून घटना - दिनविशेष


२०१८: फोक्सवॅगन - कंपनीला उत्सर्जन (Emission) घोटाळ्यासाठी एक अब्ज युरो (8190 करोड)चा दंड ठोठावण्यात आला आहे.
२००७: अल अस्कारी मशिद, इराक - दुसऱ्यांदा बॉम्बस्फोट हल्ला झाला.
२००५: मायकेल जॅक्सन - यांना १९९३ मध्ये एका मुलाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपातून दोषमुक्तता.
२००२: अँटी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र करार - या करारातून अमेरिकेची माघार.
२०००: विश्वनाथन आनंद - स्पेन मधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला.
१९९७: दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे १०० जण जखमी झाले.
१९८३: पायोनियर १० - हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
१९७८: इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.
१९५६: पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.
१९४४: दुसरे महायुद्ध - जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.
१९४४: दुसरे महायुद्ध - व्हिलर्स-बोकेजची लढाई: जर्मनीच्या मायकेल विटमन यांनी ब्रिटिश सेनेचे १४ रणगाडे, १५ ट्रक आणि २ अँटी-टॅंक गन्स उध्वस्त केल्या.
१९४४: दुसरे महायुद्ध - जर्मनीने इंग्लंडवर पहिला V1 फ्लाइंग बॉम्ब हल्ला केला.
१९३४: व्हेनिसमध्ये ऍडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची भेट.
१८८६: कॅनडा - देशातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024