१८ सप्टेंबर घटना - दिनविशेष


२०१६: उरी आतंकी हल्ला - जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाने केलेल्या भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील उरी हल्ल्यात भारतीय लष्कराचे १९ जवानांचे निधन.
२०१४: स्कॉटलंड - युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्याच्या विरोधात ५५% ते ४५% मते दिली.
२०११: सिक्कीम भूकंप - ईशान्य भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि दक्षिण तिबेटमध्ये जाणवला.
२००२: हृषिकेश मुखर्जी - दिग्दर्शक, यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९९: व्यंकटेश माडगूळकर - साहित्यिक, यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.
१९९७: टेड टर्नर - या अमेरिकन उद्योगपतींनी संयुक्त राष्ट्रांना १ अब्ज अमेरिकी डॉलर (तेव्हाचे ११४० करोड रुपये) दान केले.
१९९७: कालिदास संस्कृत विद्यापीठ, महाराष्ट्र - स्थापना.
१९९०: संयुक्त राष्ट्र - लिकटेंस्टीनचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९८४: जो किटिंगर - यांनी अटलांटिक महासागर पहिल्यांदाच एकट्याने बलून मधून पार केले.
१९७७: व्हॉयेजर-1 - पृथ्वी आणि चंद्राचे पहिले दूरचे एकत्र छायाचित्र घेतले.
१९७४: फिफी चक्रीवादळ - ११० मैल प्रतितास वेगाने होणाऱ्या चक्रीवादळात किमान ५ हजार लोकांचे निधन. होंडुरासला धडकले आणि 5,000 लोकांचा मृत्यू झाला.
१९७३: संयुक्त राष्ट्र - बहामास, पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९६२: संयुक्त राष्ट्र - बुरुंडी, जमैका, र्‌वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१९६०: फिडेल कॅस्ट्रो - यांचे संयुक्त राष्ट्रसंघातील क्युबन प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख म्हणून न्यूयॉर्क शहरात आगमन झाले.
१९४८: मार्गारेट चेस स्मिथ - दुसर्‍या सिनेटचा कार्यकाळ पूर्ण न करता युनायटेड स्टेट्स सिनेटवर निवडून आलेल्या पहिल्या महिला बनल्या.
१९४८: हैद्राबाद मुक्तिसंग्राम - ओपेशन पोलो: भारतीय सैन्याने हैदराबादच्या सैन्याचे आत्मसमर्पण स्वीकारल्यानंतर ऑपरेशन पोलो बंद करण्यात आले.
१९४४: दुसरे महायुद्ध - ब्रिटिश एचएमएस ट्रेडविंड पाणबुडीने टॉर्पेडोज हल्ला करून जपानी जूनयो मारू जहाज बुडवले, यात किमान ५,६०० लोकांचे निधन.यातील बहुतेक लोक गुलाम मजूर आणि युद्धबंदी कैदी होते.
१९४४: दुसरे महायुद्ध - एराकोर्टची लढाई: सुरू झाली.
१९४३: दुसरे महायुद्ध - एडॉल्फ हिटलर यांनी डॅनिश ज्यूंना हद्दपार करण्याचे आदेश दिले.
१९३९: दुसरे महायुद्ध - जर्मनी कॉलिंग या रेडिओ कार्यक्रमाने नाझी प्रचार प्रसारित करण्यास सुरुवात केली.
१९३४: लीग ऑफ नेशन्स - सोव्हिएत युनियनचा लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश.
१९२७: कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टीम - प्रसारित झाली.
१९२७: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स - स्थापना.
१९२४: महात्मा गांधी - यांचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू.
१९२२: लीग ऑफ नेशन्स - हंगेरी देशाचा लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश.
१९१९: फ्रिट्झ पोलार्ड - हे व्यावसायिक फुटबॉल खेळणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णीय व्यक्ती बनले.
१९१९: नेदरलंड - देशामध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९०६: हाँगकाँग वादळ - या वादळात किमान १० हजार लोकांचे निधन.
१८८२: पॅसिफिक स्टॉक एक्सचेंज - सुरूवात झाली.
१८७९: ब्लॅकपूल इल्युमिनेशन्स - प्रथमच साजरे करण्यात आले.
१८६२: थँक्सगिव्हिंग डे - कॉन्फेडरेट राज्यांनी प्रथमच आणि एकमेव थँक्सगिव्हिंग डे साजरा केला.
१८५१: द न्यूयॉर्क टाइम्स - या वृत्तपत्राचे त न्यूयॉर्क डैली टाइम्स नावाने पहिले प्रकाशन, पुढे नाव बदलून त न्यूटॉक टाइम्स करण्यात आले.
१८१०: चिली - देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
१८०९: रॉयल ऑपेरा हाऊस, लंडन - उदघाटन.
१५०२: ख्रिस्तोफर कोलंबस - दर्यावर्दी शेवटच्या सफरीत होंडुरास येथे पोचले.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024