२४ मार्च घटना
घटना
- २००८: – भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.
- १९९८: – टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.
- १९९३: – शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.
- १९७७: – स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.
- १९२९: – लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.
- १९२३: – ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.
- १८९६: – अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नलचे प्रसारण केले.
- १८५५: – आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
- १८३७: – कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.
- १६७७: – दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.
- १३०७: – देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.