२०२४:इस्रायल-हमास युद्ध- वर्ल्ड सेंट्रल किचन ड्रोन हल्ले— वर्ल्ड सेंट्रल किचनमधील सात स्वयंसेवक आणि एक दुहेरी अमेरिकन-कॅनडियन नागरिक- सहा ब्रिटीश, पोलिश, ऑस्ट्रेलियन आणि पॅलेस्टिनी नागरिकांसह, देर अल-बालाहच्या दक्षिणेस इस्त्रायली हवाई हल्ल्यात ठार झाले.
२००४:— गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
१९९०:— डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान.
१९७६:अँपल इंक— सुरवात.
१९७६:— ऍपल इंक. कंपनी ची स्थापना झाली.
१९७३:— कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरूवात झाली.
१९५७:— भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.
१९५५:— गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.
१९३७:— रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन झाले.
१९३६:— ओरिसा राज्याची स्थापना झाली.
१९३५:भारतीय रिझर्व्ह बँक— सुरवात.
१९३३:— भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण.
१९२८:— पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.
१९२४:— रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले.
१८९५:— भारतीय लष्कर स्थापन झाले.
१८८७:— मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.
१६६९:— उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.