१ मे घटना
घटना
- १७३९: – चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. तीन महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.
- १८४०: – द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये जारी केले गेले.
- १८४४: – हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल स्थापन झाले.
- १८८२: – आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे स्थापना झाली.
- १८८४: – अमेरिकेत कामगारांना एका दिवसात ८ तास कामकाज असावे ह्या मागणीची घोषणा.
- १८८६: – आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसऱ्या;या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.
- १८९०: – जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
- १८९७: रामकृष्ण मिशन – स्वामी विवेकानंद यांनी सुरूवात केली.
- १९२७: जागतिक कामगार दिन – जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
- १९३०: – सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
- १९४०: – युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.
- १९६०: – गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- १९६१: – क्युबाचे पंतप्रधान फिदेल कॅस्ट्रो यांनी क्यूबा देश समाजवादी राष्ट्र घोषित करून निवडणुका रद्द केल्या.
- १९६२: – महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
- १९७८: – जपानचे नामी उमुरा हे एकटे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.
- १९८३: – अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.
- १९९८: – पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
- १९९९: – नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.
- २००९: – स्वीडन मध्ये समलिंगी विवाह अधिकृत करण्यात आला.
- २०१५: दिनविशेष – दिनविशेष www.dinvishesh.com या संकेत स्थळाची सुरवात.