१० जानेवारी घटना - दिनविशेष


२०२२: पहिले डुक्कर ते मनुष्य हृदय प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आले.
१९७२: पाकिस्तान मधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.
१९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
१९२९: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले द ऍडव्हेंचर्स ऑफ टिनटिन हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.
१९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
१९२०: पहिले महायुद्ध व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
१८७०: जॉन डी. रॉकफेलर यांनी स्टँडर्ड ऑईल कंपनीची स्थापना केली.
१८६३: चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.
१८१०: नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाइन या त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.
१८०६: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.
१७३०: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
१६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024