२०१३:हवाई— देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली.
२०१३:४ वर्ल्ड ट्रेड सेंटर— अधिकृतपणे उघडले.
२०१२:सूर्यग्रहण— ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.
१९९५:मोझांबिक— देश पूर्वीच्या ब्रिटिश साम्राज्याचा भाग नसून सुद्धा राष्ट्रकुल राष्ट्रांमध्ये (कॉमन वेल्थ) सामील होणारे हे पहिला देश बनला.
१९९४:स्वीडन— देशाने युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
१९९१:कारेलिया प्रजासत्ताक— रशियाचे स्वायत्त प्रजासत्ताक स्थापन झाले.
१९७०:भोला चक्रीवादळ— या २४० किमी/तास (१५० mph) उष्णकटिबंधीय चक्रीवादळामुळे बांगलादेशच्या गंगा डेल्टा प्रदेशात एका रात्रीत अंदाजे ५ लाख लोकांचे निधन. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती आहे.
१९४७:AK-47 असॉल्ट रायफल— सोव्हिएत युनियनने या पहिल्या योग्य असॉल्ट रायफलची निर्माती केली.
१९३१:शंकर रामचंद्र दाते— यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.
१९२७:हॉलंड बोगदा— न्यू जर्सीला न्यूयॉर्क शहराशी जोडणारा पहिला हडसन नदी वाहन बोगदा म्हणून वाहतुकीसाठी खुला झाला.
१९२१:अखिल भोर संस्थान प्रजा सभा— स्थापन.
१९१८:पहिले महायुद्ध— मित्र राष्ट्रांच्या सैन्याने ऑट्टोमन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल ताब्यात घेतली.
१९१७:पहिले महायुद्ध— मोंटे ग्रप्पाची पहिली लढाई: सुरुवात
१९१३:रवीन्द्रनाथ टागोर— यांना गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले.
१८६४:ग्रीस— देशाने नवीन संविधान स्वीकारले.
१८५१:सिएटल, अमेरिका— शहराची सुरवात.
१८४१:जेम्स ब्रॅडी— यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळाले.