१४ सप्टेंबर घटना - दिनविशेष

  • हिंदी दिन

२०२२: भारतातील, जम्मू आणि काश्मीर, पूंछ जिल्ह्यात बस दरीत कोसळून ११ लोकांचे निधन तर २९ जण जखमी झाले.
२०१५: गुरुत्वीय लहरी - गुरुत्वीय लहरींचे (gravitational waves) पहिले निरीक्षण करण्यात आले.
२००३: इस्टोनिया - देशात युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा निर्णय करण्यात आला.
२०००: मायक्रोसॉफ्ट - मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज एमई (Windows ME) प्रकाशित केले.
१९९९: संयुक्त राष्ट्र - किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
१९९७: अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटना - बिलासपूर येथे झालेल्या दुर्घटनेत किमान ८१ लोकांचे निधन.
१९९५: दत्ता डावजेकर - संगीतकार, यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
१९८५: पेनांग ब्रिज, मलेशिया - पेनांग बेटाला मुख्य भूमीशी जोडणारा मलेशिया देशातील सर्वात लांब पूल वाहतुकीसाठी खुला झाला.
१९८४: जो किटिंगर - हे एकट्याने अटलांटिक महासागर गॅस फुग्याने उडून ओलांडणारे पहिले व्यक्ती बनले.
१९६०: ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज (OPEC) - स्थापना.
१९४९: हिंदी दिन - हिंदी भारताची अधिकृत भाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.
१९४८: हैदराबाद मुक्तिसंग्राम - ऑपेरेशन पोलो: भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून, औरंगाबाद काबीज केले.
१९१७: रशिया - देशाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.
१८९३: पहिले सार्वजनिक गणपती - सरदार खाजवीवाले, गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले.
१७५२: ब्रिटीश साम्राज्य - अकरा दिवस वगळून ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले (कालचा दिवस २ सप्टेंबर होता).
०७८६: हरुन अल रशिद - बगदादचा खलिफा झाला.


ऑक्टोबर

सो मं बु गु शु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024