१८ एप्रिल घटना - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन

२००१: भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक GSLV- D वाहकाचे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण झाले.
१९७१: एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान सम्राट अशोक हे सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले.
१९५४: गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.
१९५०: आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
१९३६: पेशव्यांची राजधानी असणाऱ्या;या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.
१९३०: आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले.
१९२४: सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड् पुस्तक प्रकाशित केले.
१९२३: पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील पहिल्या संगमरवरी अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली.
१९१२: टायटॅनिक मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन कार्पेथिया हे जहाज न्यूयॉर्कला पोचले.
१८९८: जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी.
१८५३: मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.
१८३१: युुनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा ची स्थापना झाली.
१७२०: शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.
१७०३: औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.
१३३६: हरिहर व बुक् क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024