२०१७:
मारिया चक्रीवादळ - या वादळामुळे पोर्तो रिकोमध्ये किमान २,९७५ लोकांचे निधन.
२००१:
दहशतवादाविरुद्ध युद्ध - अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यासाठी लढा देण्याची घोषणा केली.
१९९०:
दक्षिण ओसेशिया - देशाने जॉर्जियापासून आपले स्वातंत्र्य घोषित केले.
१९७७:
संयुक्त राष्ट्र - व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
१९६५:
बुर्कीची लढाई - १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्याने डोगराई ताब्यात घेतले.
१९४६:
कान्स फिल्म फेस्टिव्हल - पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.
१९४२:
युक्रेनमधील होलोकॉस्ट - दोन दिवसांत किमान ३ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.
१९४१:
लिथुआनियामधील होलोकॉस्ट - लिथुआनियन नाझी आणि स्थानिक पोलिसांनी ४०३ ज्यूं लोकांची सामूहिक हत्या केली.
१८९३:
चार्ल्स ड्युरिया - यांनी त्याच्या भावासोबत पहिल्या अमेरिकन-निर्मित गॅसोलीन-चालित ऑटोमोबाईलची रोड-चाचणी केली.
१८५७:
१८५७ चा राष्ट्रीय उठाव - ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली, आणि या उठावाचा अंत झाला.
१८५४:
क्रिमियन युद्ध: - अल्माची लढाई: ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याने रशिय सैन्याचा पराभव केला.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024