२१ फेब्रुवारी घटना - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

२०२३: न्यू स्टार्ट करार - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युनायटेड स्टेट्स बरोबरचा शेवटचा उर्वरित अण्वस्त्र नियंत्रण करार 'न्यू स्टार्ट करार' मधील रशियाचा सहभाग निलंबित केला.
२०२२: रशिया-युक्रेनियन युद्ध - रशियाने लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक आणि डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक हे युक्रेनपासून स्वतंत्र असल्याचे घोषित करून त्या प्रदेशामध्ये लष्करी ताफा नेला.
२०१३: हैदराबाद बॉम्बस्फोट - अनेक बॉम्बस्फोटांमध्ये किमान १७ लोकांचे निधन तर ११९ लोक जखमी झाले.
१९९५: स्टीव्ह फॉसेट - अमेरिकन वैमानिक, हे फुग्यातून पॅसिफिक महासागर एकट्याने उड्डाण करून ओलांडणारे पहिले व्यक्ती बनले.
१९७२: लुना २० - सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना २० हे चंद्रावर उतरले.
१९४८: NASCAR - स्थापना झाली.
१९३४: ऑगस्टो सँडिनो - निकाराग्वा देशाचे क्रांतिकारक, यांना फाशी देण्यात आली.
१९२५: द न्यूयॉर्कर - या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९२१: जॉर्जिया - देशाच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या संविधान सभेने देशाची पहिली राज्यघटना स्वीकारली.
१९१८: कॅरोलिना पॅराकीट - या जातीच्या शेवटच्या पक्षाचे सिनसिनाटी प्राणीसंग्रहालयात बंदिवासात निधन, ही प्रजाती नामशेष झाली.
१९१६: पहिले महायुद्ध - व्हरडूनची लढाई: फ्रान्समध्ये सुरू झाली.
१९१५: लाहोर कट - लाहोर, बनारस व मीरठ या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.
१८७८: पहिली टेलिफोन डिरेक्टरी - न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.
१८६६: ल्युसी हॉब्स टेलर - अमेरिकन दंतचिकित्सक, या दंतचिकित्सा शाळेतून पदवीधर होणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला बनल्या.
१८४८: द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो - कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी 'द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो' प्रकाशित केला.
१८४२: जॉर्ज ग्रीनॉ - यांना शिवणाच्या मशिनचे (शिवणयंत्र) पेटंट मिळाले.
१८०४: पहिले सेल्फ-प्रोपेलिंग स्टीम लोकोमोटिव्ह - पहिले वाफेवर चालणारे इंजिन सुरु झाले.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024