२०१५:आयर्लंड— देश सार्वजानिक जनमतदानानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवण्यासाठी जगातील पहिला देश बनला.
२०१२:टोकियो स्कायट्री— लोकांसाठी खुले झाले. हा जगातील सर्वात उंच टॉवर आहे (६३४ मीटर), आणि बुर्ज खलिफा (८२९.८ मीटर) नंतर पृथ्वीवरील दुसरी सर्वात उंच मानवनिर्मित रचना आहे.
२०१०:एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 812— ह्या बोईंग 737 विमानाचा भारतातील मँगलोर येथे अपघात, त्यात १६६ लोकांपैकी १५८ लोकांचे निधन.
२००४:मनमोहन सिंग— यांनी भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
१९७२:श्रीलंका— देशाने सिलोन हे जुने नाव बदलून श्रीलंका असे नामकरण केले.
१९६१:हुंडाबंदी कायदा— भारत देशात हुंडाबंदी कायदा अस्तित्त्वात आला.
१९६०:चिली— देशात झालेल्या ९.५ तीव्रतेचा भूकंप हा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.
१९४२:मेक्सिको— देशाने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात प्रवेश केला.
१९२७:चीन— देशात झालेल्या ८.३ तीव्रतेच्या भूकंपात २,००,००० पेक्षा जास्त लोकांचे निधन.
१९१५:स्कॉटलंड— देशात ३ रेल्वेगाड्यांची टक्कर होऊन २२७ लोकांचे निधन तर २४६ लोक जखमी झाले.
१९०६:फ्लाईंग मशीन— राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट घेतले.
१७६२:हॅम्बुर्ग करार— स्वीडन आणि प्रुशिया देशांमध्ये हॅम्बुर्ग करार झाला.