२३ डिसेंबर घटना - दिनविशेष


२०१३: सलमान खान विरुद्ध १७ साक्षीदारांनी साक्ष नोदवल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमान खान विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत, खटला सत्र न्यायालयात वर्ग केला.
२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.
२०००: कलकत्ता शहराचे नाव कोलकता असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी
१९७०: धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.
१९५४: डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.
१९५४: डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.
१९४७: अमेरिकेतील बेल रिसर्च लॅब्ज या संशोधन संस्थेने ट्रॅन्झिस्टर या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली.
१९४०: वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
१९१४: पहिले विश्वयुद्ध ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो इजिप्त येथे आगमन.
१८९३: हॅन्सेल ऍॅंड ग्रेटेल या प्रसिद्ध सांगितिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024