२३ सप्टेंबर घटना - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन

२०२२: भूतान - कोरोना रोगामुळे दोन वर्षांच्या बंदीनंतर भूतानने आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यंटन पुन्हा सुरु केले.
२०१९: थॉमस कूक ग्रुप कंपनी - या प्रसिद्ध कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. किमान ६ लाख प्रवाशी ग्राहक जगभरात अडकले.
२००४: जीन चक्रीवादळा, हैती - वादळामुळे किमान ३ हजार लोकांचे निधन.
२००२: मोझिला फायरफॉक्स - ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
१९८३: संयुक्त राष्ट्र - सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१९४३: दुसरे महायुद्ध - इटालियन सोशल रिपब्लिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाझी कठपुतळी राज्याची स्थापना झाली.
१९३२: सौदी अरेबिया - हेझाझ आणि नेजडचे राज्य मिळून एकत्रीकरण पूर्ण झाले.
१९०८: युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा, कॅनडा - स्थापना झाली.
१९०५: कार्लस्टॅड करार - नॉर्वे आणि स्वीडन यांच्यात शांतता करार.
१८८९: निन्टेन्डो कंपनी लिमिटेड - स्थापना.
१८८४: बाँबे मिल हँड्स असोसिएशन - गिरणी कामगार संघटनेची स्थापना.
१८४६: नेपच्यून ग्रह - अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.
१८०३: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध - अश्तेची लढाई: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यात लढाई.
१६४१: मर्चंट रॉयल जहाज - १,००,००० पौंड सोन्याचा खजिना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले.


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024