२९ सप्टेंबर घटना - दिनविशेष

  • जागतिक हृदय दिन

२०२२: गर्भपात कायदा, भारत - भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भधारणेच्या २४ व्या आठवड्यापर्यंत सर्व महिलांसाठी गर्भपात शस्त्रक्रिया कायदेशीर केली आहे.
२०१६: उरी सर्जिकल स्ट्राइक - उरी मध्ये झालेल्या आंतकी हल्ल्याच्या अकरा दिवसांनंतर, भारतीय लष्कराने पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमध्ये संशयित अतिरेक्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले.
२०१२: अल्तमस कबीर - भारताचे ३९ वे सरन्यायाधीश बनले.
२०११: वचठी प्रकरण, भारत - विशेष न्यायालयाने सर्व २६९ आरोपी अधिकार्‍यांना दलितांवरील अत्याचारासाठी आणि १७ जणांना वचठी प्रकरणात बलात्कारासाठी दोषी ठरवले .
२००८: २००८ मोठी मंदी - युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजने आणीबाणीच्या आर्थिक स्थिरीकरण कायद्यावर मतदान केल्यानंतर शेअर बाजार कोसळला, आणि २००८ ची मोठी मंदी सुरु झाली.
२००७: काल्डर हॉल - हे जगातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र नियंत्रित स्फोटात पाडण्यात आले.
१९७१: ओमान - अरब लीगमध्ये सामील झाला.
१९६३: बिर्ला तारांगण. कोलकाता - आशियातील पहिले तारांगण सुरू झाले.
१९५७: किशथिन आपत्ती - आजवर झालेली तिसरी सर्वात वाईट आण्विक आपत्ती आहे.
१९५४: युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च (CERN) - संस्था स्थापन करणाऱ्या अधिवेशनावर स्वाक्षरी झाली.
१९४१: दुसरे महायुद्ध - बाबी यार हत्याकांड: सुरू झाले.
१९३२: चाको युद्ध - बोकेरॉनची लढाई: पॅराग्वे आणि बोलिव्हिया यांच्या युद्धतील शेवटचा दिवस .
१९२३: ट्रॅक आणि फील्ड चॅम्पियनशिप - महिलांसाठी पहिली अमेरिकन ट्रॅक आणि फील्ड चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली.
१९१८: पहिले महायुद्ध - बल्गेरियाने सॅलोनिकाच्या युद्धविरामावर स्वाक्षरी केली .
१९१८: पहिले महायुद्ध - मित्र राष्ट्रांच्या हल्ल्याने हिंडेनबर्ग लाइन तुटली .
१९१७: किंग जॉर्ज हायस्कूल, दादर - इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा सुरू झाली.
१८८५: सार्वजनिक इलेक्ट्रिक ट्रामवे ब्लॅकपूल, इंग्लंड - जगातील पहिला व्यावहारिक इलेक्ट्रिक ट्रामवे सुरु झाला.
१८६४: अमेरिकन गृहयुद्ध - शॅफिन्स फार्मची लढाई लढली गेली.
१८५५: इलोइलो बंदर, फिलिपिन्स - स्पॅनिश प्रशासनाने हे बंदर जागतिक व्यापारासाठी खुले केले.
१८४८: हंगेरियन क्रांती - पॅकोझडची लढाई: हंगेरियन आणि क्रोएशियन सैन्यांमधील पहिली लढाई आहे .
१८२९: लंडन - मेट्रोपॉलिटन पोलिस यंत्रणेची सुरवात.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024