२०१७:निन्टेन्डो स्विच— जगभरात विक्रीसाठी सुरु झाले.
२०१५:जागतिक वन्यजीव दिन— २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
२००५:स्टीव्ह फॉसेट— यांनी ग्लोबल फायर या फुग्यातून पॅसिफिक महासागर एकट्याने उड्डाण करून न थांबता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
२००५:मार्गारेट विल्सन— यांची न्यूझीलंड हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षपदी निवड झाली. कोणत्याही देशाच्या सर्व सर्वोच्च राजकीय कार्यालयांमध्ये महिलांची नियुक्ती झाल्याची पहिली घटना.
१९८६:ऑस्ट्रेलिया कायदा १९८६— ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.
१९७३:भारत— ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू.
१९६९:अपोलो प्रोग्राम— नासाने चंद्र मॉड्यूलची चाचणी घेण्यासाठी अपोलो ९ लाँच केले.
१९६६:धनंजय रामचंद्र गाडगीळ— हे पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू बनले.
१९५८:नुरी अल-सैद— हे आठव्यांदा इराकचे पंतप्रधान बनले.
१९४५:दुसरे महायुद्ध— खराब हवामानामुळे कमी दिसत असल्यामुळे इंग्लंडच्या आरएएफ ने चुकून नेदरलँड्सच्या हेगमधील बेझुइडेनहाऊट भागात बॉम्बफेक केली या दुर्घटनेत किमान ५११ लोकांचे निधन.
१९४३:दुसरे महायुद्ध— लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ लोकांचे निधन.
१९३९:महात्मा गांधी— यांनी ब्रिटिश सरकारच्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले.
१९३८:सौदी अरेबिया— देशामध्ये खनिज तेलाचा शोध लागला.
१९३१:अमेरिका— देशाने स्टार-स्पॅंगल्ड बॅनरचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केले.
१९३०:बाबासाहेब आंबेडकर— यांनी नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी सत्याग्रह केला.
१९२३:टाईम मॅगझिन— पहिले मासिक प्रकाशित झाले.
१९१८:ब्रेस्ट-लिटोव्हस्कचा करार— पहिल्या महायुद्धातून माघार घेण्यास मान्य करण्यासाठी रशियाने या करार स्वाक्षरी केली.
१८९१:शोशोन नॅशनल फॉरेस्ट, अमेरिका— जगातील पहिले राष्ट्रीय वनउद्यान सुरु झाले.
१८६५:हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC)— सुरवात.
१८४५:अमेरिका— फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.
१५७५:तुकारोची लढाई— मुघल सम्राट अकबरने बंगालचा सुलतान दाऊद खान करानीच्या सैन्याचा पराभव केला.