४ एप्रिल घटना
-
२०२४: मिरियम स्पिटेरी डेबोनो — माल्टा देशाच्या अध्यक्षपदी शपथ घेतली, जॉर्ज वेला यांच्यानंतर या पदाची शपथ घेणाऱ्या तिसऱ्या महिला बनल्या.
-
१९९०: — लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
-
१९६८: — जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.
-
१९४९: — पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.
-
१९४४: दुसरे महायुद्ध — ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.
-
१८८२: — ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या .