२०१०:
बुर्ज खलिफा - बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीचे उदघाटन झाले.
२००४:
नासाची मानवरहित स्पिरीट ही गाडी मंगळ ग्रहावर उतरली.
१९९६:
साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या बिंब प्रतिबिंब या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.
१९६२:
न्यूयॉर्क अमेरिका येथे पहिली चालकरहित रेल्वे सुरु झाली.
१९५९:
रशियाचे लुना-१ हे अंतराळयान चंद्राजवळ पोहोचले.
१९५८:
स्पुटनिक-१ हा पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर परत उतरला.
१९५४:
मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९५२:
ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.
१९४८:
म्यानमार - ब्रम्हदेश (म्यानमार) देशाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९४४:
१० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.
१९३२:
सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरू यांन दोन वर्षांची शिक्षा झाली.
१९२६:
क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.
१८८५:
आंत्रपुच्छ (appendix) काढुन टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. विल्यम डब्ल्यू. ग्रांट यांनी मेरी गार्टसाईड या रुग्णावर केली.
१८८१:
केसरी वृत्तपत्र - लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सुरु केले.
१८४७:
सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्हॉल्व्हर पिस्तुल विकले.
१६४१:
कर भरायला नकार देणाऱ्या;या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हे हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये शिरले. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली. त्यात चार्ल्स यांचा पराभव होऊन मग त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.
१४९३:
क्रिस्तोफर कोलंबस त्यांच्या पहिल्या सफरीच्या शेवटी नव्या जगातून परत निघाले.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025