४ मार्च घटना - दिनविशेष


२०२२: पॅरालिम्पिक - २०२२ हिवाळी पॅरालिम्पिक बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आले आहे. बीजिंग शहर उन्हाळी आणि हिवाळी पॅरालिम्पिक दोन्हीचे आयोजन करणारे पहिले शहर बनले.
२००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.
१९९६: चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.
१९७४: पिपल मॅगझिनचे पहिले प्रकाशन झाले.
१९६१: इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात आय. एन.एस. विक्रांत नावाने दाखल झाली.
१९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
१९३६: हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.
१८८२: ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु.
१८६१: अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.
१८३७: शिकागो शहराची स्थापना झाली.
१७९१: व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024