१२ जुलै
घटना
- २००१: एम. एस. स्वामीनाथन — यांना टिळक पुरस्कार प्रदान.
- १९९९: सुनील गावसकर — यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
- १९९८: फ़ुटबाँल विश्वकरंडक — फ्रान्सने ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन १९९८ चा फ़ुटबाँल विश्वकरंडक जिंकला.
- १९९५: दिलीपकुमार — यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
- १९८५: पी. एन. भगवती — भारताचे १७वे सरन्यायाधीश बनले.
- १९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) — स्थापना झाली.
- १९७९: किरिबाती — देशाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
- १९६२: द रोलिंग स्टोन्स — यांचा पहिला कार्यक्रम लंडनमधील मार्क्वी क्लबमधे झाला.
- १९६१: धरणफुटी, पुणे — पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुरात किमान २,००० लोकांचे निधन तर १ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले.
- १९२०: पनामा कालवा — औपचारिक उदघाटन झाले.
- १७९९: रणजित सिंग — यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.
- १६७४: मराठा साम्राज्य — शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.
जन्म
- १९६१: शिव राजकुमार — भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते
- १९४९: नारायण साठम — भारतीय क्रिकेट खेळाडू
- १९३३: व्हिक्टर पुअर — अमेरिकन अभियंते, डेटापॉइंट २२००चे निर्माते
- १९३१: जोसेफ मिट्टाथनी — भारतीय रोमन कॅथलिक प्रीलेट
- १९२८: सुब्बू अरुमुगम — भारतीय लेखक आणि कथाकार
- १९२०: यशवंत विष्णू चंद्रचूड — १६वे सरन्यायाधीश
- १९१३: मनोहर माळगावकर — इंग्रजी लेखक
- १८६३: वि. का. राजवाडे — इतिहासाचार्य
- १८५४: जॉर्ज इस्टमन — अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक
- १८५२: हिपोलितो य्रिगोयेन — अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष
- १८१७: हेन्री थोरो — अमेरिकन लेखक व विचारवंत
निधन
- २०२२: अवधश कौशल — भारतीय सामाजिक कार्यकर्ता आणि शैक्षणिक — पद्मश्री
- २०१३: अमर बोस — बोस कॉर्पोरेशनचे संस्थापक
- २०१३: प्राण — भारतीय चित्रपट अभिनेते — पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
- २०१२: दारा सिंग — मुष्टीयोद्धा आणि अभिनेते
- २००१: देवांग मेहता — तंत्रज्ञान अग्रणी
- १९९९: राजेंद्रकुमार — हिंदी चित्रपट अभिनेते
- १९९४: वसंत साठे — हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार
- १९४९: डग्लस हाइड — आर्यलँड देशाचे १ले राष्ट्रपती
- १९३२: टॉमस बाटा — बाटा शूज कंपनीचे संस्थापक
- १९३१: नॅथन सॉडरब्लॉम — स्वीडिश आर्चबिशप, इतिहासकार आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
- १९१०: चार्ल्स रॉल्स — इंग्लिश अभियंते आणि उद्योगपती, रोल्स-रॉइस लिमिटेड कंपनीचे सह-संस्थापक
- १८९२: अलेक्झांडर कार्टराईट — बेसबॉलचे जनक
- १५७६: दाऊद खान करानी — बंगालच्या करानी साम्राज्याचा शेवटचा शासक