२०१४:— इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.
२००१:कोनेरु हंपी— या बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारतातील सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू आहेत.
१९९६:एच. डी. देवेगौडा— यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
१९९३:— पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
१९९१:बोरिस येल्तसिन— यांची रशियाचे पहिले अध्यक्ष म्हणून लोकशाही पद्धतीने निवड.
१९९०:रशिया दिन— रशियन फेडरेशनच्या संसदेने औपचारिकपणे त्याचे सार्वभौमत्व घोषित केले.
१९७५:इंदिरा गांधी— अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
१९६४:नेल्सन मंडेला— यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
१९४४:दुसरे महायुद्ध— ऑपरेशन ओव्हरलॉर्ड: अमेरिकन पॅराट्रूपर्सनी कॅरेंटन, नॉर्मंडी, फ्रान्स शहर सुरक्षित केले.
१९४३:होलोकॉस्ट— जर्मनीच्या सैन्याने पोलंडमधील ब्रझेझनी येथील ज्यू वस्ती नष्ट केली. सुमारे ११८० ज्यूं लोकांची हत्या करण्यात आली.
१९४२:ऍन फ्रॅंक— यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.
१९४०:दुसरे महायुद्ध— १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
१९४०:दुसरे महायुद्ध— १३ हजार ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याने मेजर जनरल एर्विन रोमेल यांच्याकडे आत्मसमर्पण केले.
१९३५:चाको युद्ध— बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.
१९०५:भारत सेवक समाजाची (Servants of India Society)— स्थापना झाली.
१८९८:फिलिपाइन्स— देशाने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१८९६:जे.टी. हर्न— प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू बनले.