२० ऑक्टोबर
घटना
-
२०११:
— लिबीयन गृहयुद्ध - राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.
-
२००१:
— रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर.
-
१९९५:
— ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिंदी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान जाहीर.
-
१९९१:
— उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
-
१९७३:
— सिडनी ऑपेरा हाऊसचे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.
-
१९७१:
— मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.
-
१९७०:
— हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.
-
१९६९:
— डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.
-
१९६२:
— चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे चीन-भारत युद्धास सुरवात.
-
१९५२:
— केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत् अटकसत्र सुरू.
-
१९५०:
— कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.
-
१९४७:
— अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
-
१९०४:
— चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.
अधिक वाचा: २० ऑक्टोबर घटना
जन्म
-
१९७८:
वीरेन्द्र सहवाग
— भारतीय क्रिकेटपटू — पद्मश्री
-
१९६३:
नवजोत सिंग सिद्धू
— क्रिकेटपटू, समालोचक व खासदार
-
१९२७:
गुंटूर सेशंदर शर्मा
— भारतीय कवी आणि समीक्षक
-
१९२३:
उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर
— भारतीय ध्रुपद गायक — पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
-
१९२०:
सिद्धार्थ शंकर रे
— पश्चिम बंगालचे ६वे मुख्यमंत्री
-
१९१६:
मेहबूबहुसेन पटेल
— लोकशाहीर
-
१९१६:
शाहीर अमर शेख
— लोकशाहीर
-
१८९३:
जोमोके न्याटा
— केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
-
१८९१:
सर जेम्स चॅडविक
— ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक — नोबेल पुरस्कार
-
१८५५:
गोवर्धनराम त्रिपाठी
— गुजराथी लेखक
अधिक वाचा: २० ऑक्टोबर जन्म
निधन
-
२०१५:
सय्यद जहूर कासिम
— भारतीय सागरी जीवशास्त्रज्ञ — पद्म भूषण, पद्मश्री
-
२०१२:
जॉन मॅककनेल
— पृथ्वी दिनाची सुरवात करणारे
-
२०११:
मुअम्मर गडाफी
— लिबीयाचे हुकूमशहा
-
२०१०:
फारूख लेघारी
— पाकिस्तानचे ८वे राष्ट्रपती
-
२०१०:
पार्थ सारथी शर्मा
— भारतीय क्रिकेटपटू
-
२००९:
बाबा कदम
— गुप्तहेरकथालेखक
-
१९९९:
माधवराव लिमये
— समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार
-
१९९६:
बंडोपंत गोखले
— पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक
-
१९८४:
पॉल डायरॅक
— इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
-
१९७४:
मास्टर कृष्णराव
— भारतीय गायक, अभिनेते व संगीतकार — पद्म भूषण
-
१९७४:
कृष्णराव (फुलंब्रीकर)
— नात मास्टर आणि गायक
-
१९६४:
हर्बर्ट हूव्हर
— अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष
-
१९६१:
व्ही. एस. गुहा
— मानववंशशास्त्रज्ञ
-
१९५६:
लॉरेन्स डेल बेल
— अमेरिकन उद्योगपती, बेल एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक
-
१८९०:
सर रिचर्ड बर्टन
— ब्रिटिश लेखक, संशोधक आणि गुप्तहेर
अधिक वाचा: २० ऑक्टोबर निधन