२०२२:सप्टेंबरमधील सर्वाधिक तापमान— फर्नेस क्रीक, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे १२७ °F (५३°C) तापमानाची नोंद झाली आहे, सप्टेंबर महिन्यातील ही जगातील इतिहासात सर्वात जास्त तापमान नोंद आहे.
२०२२:श्रीलंका आर्थिक आणीबाणी— आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने श्रीलंकेसाठी $२.९ अब्ज अमेरिकन डॉलर्सची तात्पुरती मदत करण्यास मान्यता दिली.
१९९१:— उझबेकिस्तान सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
१९८५:— संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.
१९७९:— पायोनियर- ११ अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.
१९७२:— अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.
१९६९:— लिबीयात उठाव- हुकूमशहा मुअम्मर गडाफी सत्तेवर आला.
१९५६:— भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना.
१९५१:— अर्नेस्ट हेमिंग्वेयांची 'द ओल्ड मॅन अँड द सी' ही कादंबरी प्रकाशित झाली.
१९३९:— दुसरे जागतिक महायुद्ध: जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली.
१९२३:— टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
१९१४:— रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.
१९११:— पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.
१९०६:— इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अटॉर्नीची स्थापना झाली.