१ सप्टेंबर
घटना
-
२०२२:
सप्टेंबरमधील सर्वाधिक तापमान
— फर्नेस क्रीक, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे १२७ °F (५३°C) तापमानाची नोंद झाली आहे, सप्टेंबर महिन्यातील ही जगातील इतिहासात सर्वात जास्त तापमान नोंद आहे.
-
२०२२:
श्रीलंका आर्थिक आणीबाणी
— आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने श्रीलंकेसाठी $२.९ अब्ज अमेरिकन डॉलर्सची तात्पुरती मदत करण्यास मान्यता दिली.
-
१९९१:
— उझबेकिस्तान सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
-
१९८५:
— संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.
-
१९७९:
— पायोनियर- ११ अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.
-
१९७२:
— अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.
-
१९६९:
— लिबीयात उठाव- हुकूमशहा मुअम्मर गडाफी सत्तेवर आला.
-
१९५६:
— भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना.
-
१९५१:
— अर्नेस्ट हेमिंग्वेयांची 'द ओल्ड मॅन अँड द सी' ही कादंबरी प्रकाशित झाली.
-
१९३९:
— दुसरे जागतिक महायुद्ध: जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली.
-
१९२३:
— टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
-
१९१४:
— रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.
-
१९११:
— पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.
-
१९०६:
— इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अटॉर्नीची स्थापना झाली.
अधिक वाचा: १ सप्टेंबर घटना
जन्म
-
१९७०:
पद्मा लक्ष्मी
— भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक
-
१९४९:
पी. ए. संगमा
— लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री
-
१९४६:
रोह मू-ह्युन
— दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष
-
१९४५:
भक्ती चारू स्वामी
— कृष्णाचेतना आंतरराष्ट्रीय संस्था (इस्कॉन)चे आध्यात्मिक नेते
-
१९३३:
टी. तिरुनावुकारासू
— श्रीलंकेचे वकील आणि राजकारणी
-
१९३१:
अब्दुल हक अन्सारी
— भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान
-
१९३०:
चार्ल्स कोरिया
— भारतीय आर्किटेक्ट — पद्म विभूषण, पद्मश्री
-
१९२६:
विजयदन देठा
— भारतीय लेखक
-
१९२१:
माधव मंत्री
— भारतीय क्रिकेटर
-
१९१५:
राजिंदरसिंग बेदी
— ऊर्दू कथाकार आणि हिंदी पटकथालेखक
-
१९०८:
के. एन. सिंग
— हिंदी चित्रपटांतील गाजलेले खलनायक
-
१८९६:
स्वामी प्रभूपाद
— हरेकृष्ण पंथाचे संस्थापक
-
१८९५:
एंगलबर्ट जशचा
— मानव-सक्षम विमानांचे निर्मिते
-
१८१८:
जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ
— कोस्टा रिका देशाचे पहिले राष्ट्रपती
-
१७९५:
जेम्स गॉर्डन बेनेट
— न्यूयॉर्क हेरॉल्डचे स्थापक
अधिक वाचा: १ सप्टेंबर जन्म
निधन
-
२०२२:
मेरी रॉय
— भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि महिला हक्क कार्यकर्त्या
-
२०२०:
जेर्झी स्काझाकिएल
— पोलिश स्पीडवे रायडर, विश्वविजेते
-
२०२०:
शेखर गवळी
— भारतीय क्रिकेटपटू
-
२०१४:
जोसेफ शेव्हर्स
— स्पॅनडेक्सचे निर्माते
-
२००८:
थॉमस जे. बाटा
— बाटा शू कंपनीचे संस्थापक
-
१९७६:
पर्सी शॉ
— इंग्रज व्यावसायिक, रात्री रस्त्यावर चमकणाऱ्या प्रतिबिंबित होणाऱ्या स्टिकर (reflective road stud or cat's eye)चे निर्माते
-
१९६१:
इरो सारीनें
— फिन्निश-अमेरिकन आर्किटेक्ट, गेटवे आर्कचे रचनाकार
-
१८९३:
काशिनाथ त्र्यंबक तेलंग
— न्यायमूर्ती, कायदेपंडीत आणि समाजसुधारक
-
१७१५:
लुई (१४वा)
— फ्रान्सचा राजा
-
१५८१:
गुरू राम दास
— शीखांचे चौथे गुरू
अधिक वाचा: १ सप्टेंबर निधन