१२ ऑगस्ट घटना - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय युवा दिन
  • आंतरराष्ट्रीय हत्ती दिन

२०२२: सलमान रश्दी - एंग्लो-इंडियन लेखक, यांच्यावर चौटौका, न्यूयॉर्क, अमेरिकेत एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाला.
२००२: सर्गेई कार्जाकिन - हे १२ वर्षे ७ महिने वयाचे जगातील सर्वात लहान वयात बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनले.
१९९५: मायकेल जॉन्सन - अमेरिकन खेळाडू यांनी जागतिक मैदानी स्पर्धेत २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारे ते पहिले पुरुष धावपटू ठरले.
१९९०: स्यू (टायरानोसॉरस रेक्स सांगाडा) - हा आजपर्यंत सापडलेला सर्वात मोठा आणि संपूर्ण टायरानोसॉरस रेक्स सांगाडा, दक्षिण डकोटा येथे सापडला.
१९८९: जागतिक मराठी परिषद - कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली परिषद सुरू झाली.
१९८१: आई.बी.एम. - कंपनीचे पहिले पर्सनल कॉम्प्युटर प्रकशित करण्यात आले.
१९६०: इको - १ए - नासाच्या पहिल्या संचार उपग्रहचे यशस्वी प्रक्षेपण झाले.
१९५३: पहिला थर्मोन्युक्लिअर बॉम्ब - यशस्वी चाचणी करण्यात आली.
१९२०: स्वराज्य - शिवराम महादेव परांजपे हे साप्ताहिक सुरू केले.
१९१४: पहिले महायुद्ध - युनायटेड किंग्डमने ऑस्ट्रिया-हंगेरीवर युद्ध घोषित केले.
१९१४: पहिले महायुद्ध - हॅलेन उर्फ ​​सिल्व्हर हेल्मेट्सची लढाई सुरु.
१८८३: क्गगा (आफ्रिकन झेब्रा) - शेवटचा क्गगा (आफ्रिकन झेब्रा) मरण पावला आणि हा प्राणी नामशेष झाला.
१८६५: जोसेफ लिस्टर - यांनी पहिली अँटिसेप्टिक शस्त्रक्रिया केली.
१८५१: आयझॅक सिंगर - यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.
१७६५: अलाहाबादचा तह - ह्या करारामुळे भारतातील कंपनी राजवटीची सुरुवात झाली.
१४९२: ख्रिस्तोफर कोलंबस - नवीन जगाच्या शोधात निघालेल्या पहिल्या प्रवासात कॅनरी बेटांवर पोहोचले.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024