२०२२:सलमान रश्दी— एंग्लो-इंडियन लेखक, यांच्यावर चौटौका, न्यूयॉर्क, अमेरिकेत एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाला.
२००२:सर्गेई कार्जाकिन— हे १२ वर्षे ७ महिने वयाचे जगातील सर्वात लहान वयात बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनले.
१९९५:मायकेल जॉन्सन— अमेरिकन खेळाडू यांनी जागतिक मैदानी स्पर्धेत २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारे ते पहिले पुरुष धावपटू ठरले.
१९९०:स्यू (टायरानोसॉरस रेक्स सांगाडा)— हा आजपर्यंत सापडलेला सर्वात मोठा आणि संपूर्ण टायरानोसॉरस रेक्स सांगाडा, दक्षिण डकोटा येथे सापडला.
१९८९:जागतिक मराठी परिषद— कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली परिषद सुरू झाली.
१९८१:आई.बी.एम.— कंपनीचे पहिले पर्सनल कॉम्प्युटर प्रकशित करण्यात आले.
१९६०:इको - १ए— नासाच्या पहिल्या संचार उपग्रहचे यशस्वी प्रक्षेपण झाले.
१९५३:पहिला थर्मोन्युक्लिअर बॉम्ब— यशस्वी चाचणी करण्यात आली.
१९२०:स्वराज्य— शिवराम महादेव परांजपे हे साप्ताहिक सुरू केले.
१९१४:पहिले महायुद्ध— युनायटेड किंग्डमने ऑस्ट्रिया-हंगेरीवर युद्ध घोषित केले.
१९१४:पहिले महायुद्ध— हॅलेन उर्फ सिल्व्हर हेल्मेट्सची लढाई सुरु.
१८८३:क्गगा (आफ्रिकन झेब्रा)— शेवटचा क्गगा (आफ्रिकन झेब्रा) मरण पावला आणि हा प्राणी नामशेष झाला.
१८६५:जोसेफ लिस्टर— यांनी पहिली अँटिसेप्टिक शस्त्रक्रिया केली.
१८५१:आयझॅक सिंगर— यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.
१७६५:अलाहाबादचा तह— ह्या करारामुळे भारतातील कंपनी राजवटीची सुरुवात झाली.
१४९२:ख्रिस्तोफर कोलंबस— नवीन जगाच्या शोधात निघालेल्या पहिल्या प्रवासात कॅनरी बेटांवर पोहोचले.
जन्म
१९७२:टेक्नोहाना कोजी— जपानी सुमो कुस्तीपटू, ६५ वा योकोझुना
१९७२:ज्ञानेंद्र पांडे— भारतीय क्रिकेट खेळाडू
१९६३:कोजी कीतॉ— जपानी सुमो कुस्तीपटू, ६०वे योकोझुना
१९६०:इस्माइल श्रॉफ— भारतीय चित्रपट दिग्दर्शक
१९५९:प्रवीण ठिपसे— बुद्धीबळपटू
१९५४:फ्रँकोइस ओलांद— फ्रान्स देशाचे २४वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी
१९५२:सीताराम येचुरी— भारतीय राजकारणी आणि CPI(M) चे नेते
१९४८:फकिरा मुंजाजी शिंदे— कवी, समीक्षक व अनुवादक
१९४३:जावेद आलम— भारतीय शिक्षणतज्ज्ञ
१९३९:सुशील कोईराला— नेपाळ देशाचे ३७वे पंतप्रधान, नेपाळी राजकारणी
१९३२:सिरिकिट— थायलंड देशाची राणीसोबती
१९३०:कनागरतनम श्रीस्कंदन— श्रीलंकन अभियंते आणि नागरी सेवक