१३ एप्रिल घटना
- २०२४ : २०२४ इराण-इस्रायल युद्ध — इराणने इस्रायल देशावर ४०० ते ५०० ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे इराण, इराक, सीरिया, दक्षिण लेबनॉन आणि येमेन या प्रांतातून प्रक्षेपित केली.
- २०२२ : कोविड-१९ — जगभरात ५० करोड पेक्षा अधिक लोकाना कोरोना साठीची लागण.
- १९९७ — मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.
- १९६० — अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.
- १९४२ — व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
- १९१९ — जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
- १८४९ — हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.
- १७३१ — छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.
- १६९९ — गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.