२५ मे घटना - दिनविशेष

  • आफ्रिका मुक्ती दिन

२०२२: यासिन मलिक - काश्मिरी फुटीरतावादी नेते यांना विशेष भारतीय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
२०१२: स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.
२०११: द ओपराह विन्फ्रे शो - चा शेवट करण्यात आला. ओपराह विन्फ्रे यांनी हा शो पंचवीस वर्ष चालवला होता.
१९९९: सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणाऱ्या लाखोवारकऱ्यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.
१९९२: सुभाष मुखोपाध्याय - विख्यात बंगाली साहित्यिक यांना १९९१ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
१९८५: बांगलादेश - देशात झालेल्या चक्रीवादळात अंदाजे १०,००० लोक ठार झाले.
१९८१: रियाध गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) - या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यू. ए. ई. हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.
१९७७: चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.
१९६३: ऑर्गनायझेशन ऑफ अफ्रिकन युनिटी (OAU) - स्थापना.
१९६१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल (Apollo Program) असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.
१९५५: कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शीखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.
१९५३: टेलिव्हिजन - अमेरिकेतील पहिले सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशन वरून प्रसारण सुरू झाले.
१६६६: मराठा साम्राज्य - छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा येथे नजरकैद.


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024