२०००:— चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.
१९९२:— पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.
१९७७:— तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन ऍम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले.
१९६६:— २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.
१९५८:— निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
१८५४:— क्रिमियन युद्ध इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१७९४:— अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.
१६६७:— शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले वनाव महंमद कुली खान ठेवले.