४ ऑक्टोबर घटना
-
२०२१: बब्बा वॉलेस — NASCAR प्रमुख शर्यत जिंकणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन ड्रायव्हर बनले.
-
२००६: विकिलिक्स — ज्युलियन असांज यांनी सुरु केले.
-
१९९२: रोम सामान्य शांतता करार — मोझांबिक देशातील १६ वर्षे चालू असणारे गृहयुद्ध संपले.
-
१९९१: अंटार्क्टिक करार — पर्यावरण संरक्षणाचा प्रोटोकॉल स्वाक्षरीसाठी खुला झाला.
-
१९८५: फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन — स्थापना झाली.
-
१९८३: रिचर्ड नोबल — यांनी ब्लॅक रॉक वाळवंट, नेवाडा येथे ६३३.४६८ मैल प्रतितास (१,०१९.४६८ किमी/तास) असा नवीन लँड स्पीड रेकॉर्ड केला.
-
१९६३: फ्लोरा क्यूबा चक्रीवादळ — फ्लोरा क्यूबा आणि हैतीमध्ये किमान ६ हजार लोकांचे निधन.
-
१९५७: स्पुतनिक १ — पृथ्वीभोवती फिरणारा पहिला कृत्रिम उपग्रह बनला. ह्या घटनेपासून अंतराळयुगाचा प्रारंभ झाला.
-
१९४३: दुसरे महायुद्ध — अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.
-
१९२७: माऊंट रशमोअर — गस्टन बोरग्लम यांनी हे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.
-
१९१७: पहिले महायुद्ध — ब्रूडसेइंडची लढाई: ब्रिटीश आणि जर्मन सैन्यांमध्ये फ्लँडर्समध्ये लढली गेली.
-
१८८३: ओरिएंट एक्सप्रेस — सुरु झाली.
-
१८७६: कृषी आणि यांत्रिक महाविद्यालय, टेक्सास, अमेरिका (Agricultural and Mechanical College of Texas — पहिले सार्वजनिक महाविद्यालय म्हणून उघडले.
-
१८५३: क्रिमियन युद्ध — ऑट्टोमन साम्राज्याने रशियन साम्राज्यावर युद्ध घोषित केले.
-
१८२४: मेक्सिको — देशाने नवीन राज्यघटना स्वीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.
-
१६९३: नऊ वर्षांचे युद्ध — पिडमॉन्टीज सैन्याचा फ्रेंचांकडून पराभव झाला.
-
१६३६: तीस वर्षांचे युद्ध — विटस्टॉकची लढाई: स्वीडिश सैन्याने सॅक्सनी आणि पवित्र रोमन साम्राज्याच्या सैन्याचा पराभव केला .
-
१५३५: कव्हरडेल बायबल — विल्यम टिंडेल आणि मायल्स कव्हरडेल यांनी इंग्रजीत अनुवादासह कव्हरडेल बायबल छापले.