५ ऑगस्ट घटना - दिनविशेष


२०२०: राम मंदिर, अयोध्या - सर्वोच्च न्यायालयाच्या विवादित जमिनीवर मंदिर बांधण्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर भूमिपूजन करण्यात आले.
२०१९: भारत - जम्मू आणि काश्मीर या परदेशाला राज्यचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू आणि काश्मीर, व लडाख असे विभाजन करण्यात आले.
१९७३: मार्स ६ - अंतराळयान यूएसएसआर वरून प्रक्षेपित झाले.
१९६५: १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध - पाकिस्तानी सैनिकांनी स्थानिकांचा वेष घालून घुसकोरी केल्यामुळे युद्ध सुरु झाले.
१९६३: शीतयुद्ध - आंशिक आण्विक चाचणी बंदी करार: अमेरिका, युनायटेड किंगडम आणि सोव्हिएत युनियनने स्वाक्षरी केली.
१९६२: नेल्सन मंडेला - यांना तुरुंगात टाकण्यात आले.११९० पर्यंत त्यांची सुटका होणार नव्हती.
१९६२: मर्लिन मनरो - अमेरिकन अभिनेत्री, त्यांच्या राहत्या घरात ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृतावस्थेत सापडल्या.
१९६०: बुर्किना फासो / अपर व्होल्टा - देश फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
१९४९: इक्वाडोर भूकंप - किमान ५० शहरे उद्ध्वस्त आणि किमान ६ हजार लोकांचे निधन.
१९४४: दुसरे महायुद्ध - पोलिश बंडखोरांनी वॉर्सामधील जर्मन कामगार शिबिर (Gęsiówka) येथील ३४८ ज्यू कैद्यांना मुक्त केले.
१९४४: दुसरे महायुद्ध - पोलंडमधील वोला येथे नाझींनी ४०हजार ते ५०हजार नागरिक आणि युद्धकैद्यांचा आठवडाभर नरसंहार सुरू केला.
१९४०: दुसरे महायुद्ध - सोव्हिएत युनियनने औपचारिकपणे लॅटव्हिया पादाक्रांत केले.
१९१४: पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिगनल - ओहायो, अमेरिका येथे वापरण्यास सुरवात झाली.
१९०१: पीटर ओ'कॉनर - यांनी २४ फूट ११.७५ इंच (७.६१३७ मीटर) लांब उडीचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
१८८४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, न्यूयॉर्क, अमेरिका - याची कोनशिला घातली गेली.
१८८२: स्टँडर्ड ऑइल कंपनी (एक्सॉनमोबिल) - स्थापन झाली.
१८७४: जपान - टपाल बचत योजना सुरू केली.
१८६१: अमेरिका - सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.
१८६१: अमेरिकन गृहयुद्ध - युद्धात होणारे खर्च आणि नुकसान नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेत पहिल्यांदा आयकर लावण्यात आला.
१५८३: अमेरिका - सर हम्फ्रे गिल्बर्ट यांनी उत्तर अमेरिकेत पहिली इंग्रजी वसाहत स्थापन केली
००७०: दुसरे मंदिर, जेरुसलेम - येथे लागलेली आग विझली.
इ.स.पू. २५: हान साम्राज्य, चीन - पुनर्स्थापना झाली.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024