१ ऑक्टोबर जन्म
जन्म
- १५०७: गिअकोमो ब्रॉझझी द व्हिग्नोला – इटालियन आर्किटेक्ट, चर्च ऑफ द गेसू चे रचनाकार
- १८४२: एस. सुब्रमणिया अय्यर – भारतीय वकील आणि न्यायशास्त्रज्ञ
- १८४७: ऍनी बेझंट – थिऑसॉफिस्ट आणि भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या
- १८८१: विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक
- १८९५: लियाकत अली खान – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान
- १९०४: ए. के. गोपालन – भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी
- १९०६: सचिन देव बर्मन – भारतीय संगीतकार व गायक – पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- १९११: हेनरिक मार्क – एस्टोनिया देशाचे ५वे पंतप्रधान
- १९१९: मजरुह सुलतानपुरी – शायर, गीतकार आणि कवी – दादासाहेब फाळके पुरस्कार
- १९१९: ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक आणि अभिनेते
- १९२२: चेननिन्ग यांग – चीनी-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, शैक्षणिक – नोबेल पुरस्कार
- १९२४: विल्यम रेहनक्विस्ट – अमेरिकन वकील आणि कायदेतज्ज्ञ, अमेरिका देशाचे १६वे मुख्य न्यायाधीश
- १९२४: जिमी कार्टर – अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष – नोबेल पुरस्कार
- १९२८: शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते
- १९३०: नईमतुल्ला खान – पाकिस्तानी वकील आणि राजकारणी
- १९३०: जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री
- १९३१: अन्वर शमीम – पाकिस्तानी जनरल
- १९३७: सईद अहमद – पाकिस्तानी क्रिकेटपटू
- १९४०: मार्क सॅवॉय – अमेरिकन एकॉर्डियन प्लेयर, कॅजुन एकॉर्डियनचे निर्माते
- १९४५: इशर जज अहलुवालिय – भारतीय अर्थशास्त्र
- १९४५: रामनाथ कोविंद – भारता देशाचे १४वे राष्ट्रपती
- १९४७: दलवीर भंडारी – भारतीय वकील आणि न्यायाधीश – पद्म भूषण
- १९४७: आरोन सिचॅनोव्हर – इस्रायली जीवशास्त्रज्ञ आणि वैद्य – नोबेल पुरस्कार
- १९४७: डेव्ह अर्नेसन – अमेरिकन गेम डिझायनर, Dungeons & Dragons चे सहनिर्माते
- १९४९: आयझॅक बोनेविट्स – अमेरिकन ड्रुइड, लेखक आणि कार्यकर्ते, Ár nDraíocht Féin चे संस्थापक
- १९५१: जी. एम. सी. बालयोगी – भारतीय वकील आणि राजकारणी, लोकसभेचे १२वे अध्यक्ष
- १९५४: बिंगहॅम रे – ऑक्टोबर फिल्म्सचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती
- १९५६: अँड्रस अँसिप – एस्टोनिया देशाचे १५वे पंतप्रधान
- १९५६: थेरेसा माय – युनायटेड किंगडम देशाचे माजी पंतप्रधान
- १९६६: अशब उद्दीन – भारतीय बंगाली राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते
- १९६६: जॉर्ज वेह – लायबेरिया देशाचे २५वे राष्ट्राध्यक्ष
- १९६९: मार्कस स्टीफन – नाउरू देशाचे २७वे अध्यक्ष
- १९८४: चिरंजीवी सर्जा – भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते
- १९८५: नाझिमुद्दीन अहमद – बांगलादेशी क्रिकेटपटू
- २०८: अलेक्झांडर सेव्हरस – रोमन सम्राट