१० ऑक्टोबर घटना
घटना
- १७८०: १७८०चे चक्रीवादळ – या वादळामुळे कॅरिबियनमध्ये किमान २० ते ३० हजार लोकांचे निधन.
- १८४६: ट्रायटन – नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन, इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी शोधला.
- १८६८: दहा वर्षांचे युद्ध – क्यूबातील स्पॅनिश राजवटीविरुद्ध सुरू झाले.
- १९०३: द वुमेन्स सोशल अँड पॉलिटिकल युनियन – ब्रिटिश महिलांच्या मताधिकाराच्या समर्थनार्थ स्थापना करण्यात आली.
- १९११: चीन – देशामधे किंग वंशाचा शेवट.
- १९१३: पनामा कालवा – बांधकाम पूर्ण झाले.
- १९५७: विंडस्केल आग – ब्रिटनमधील सर्वात भीषण आण्विक अपघात.
- १९६४: टोकियो ऑलिम्पिक – स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उपग्रहांद्वारे थेट प्रक्षेपित केलेला पहिला आहे.
- १९६७: बाह्य अवकाश करार (Outer Space Trity) – अंमलात आला.
- १९७०: फिजी – देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
- १९७५: संयुक्त राष्ट्र – पापुआ न्यू गिनीचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९७९: ओल्किलुओटो अणुऊर्जा प्रकल्प, फिनलंड – सुरवात.
- १९८०: एल अस्नाम भूकंप – ७.१ मेगावॅटच्या भूकंपाने उत्तर अल्जेरियामधे किमान २,६३३ लोकांचे निधन तर ८ हजार लोक जखमी.
- १९८०: फराबुंडो मार्टी नॅशनल लिबरेशन फ्रंट – अल साल्वाडोरमध्ये स्थापना झाली.
- १९८६: सॅन साल्वाडोर भूकंप – ५.७ मेगावॅटच्या सॅन साल्वाडोर भूकंपाने एल साल्वाडोरमध्ये किमान १,५०० लोकांचे निधन.
- १९९८: आदर्श सेन आनंद – भारताचे २९ वे सरन्यायाधीश बनले.
- २००७: शेख मुस्झाफर शुकोर – पहिले मलेशियन अंतराळवीर बनले.