१२ जुलै घटना
घटना
- २००१: एम. एस. स्वामीनाथन – यांना टिळक पुरस्कार प्रदान.
- १९९९: सुनील गावसकर – यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
- १९९८: फ़ुटबाँल विश्वकरंडक – फ्रान्सने ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन १९९८ चा फ़ुटबाँल विश्वकरंडक जिंकला.
- १९९५: दिलीपकुमार – यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
- १९८५: पी. एन. भगवती – भारताचे १७वे सरन्यायाधीश बनले.
- १९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) – स्थापना झाली.
- १९७९: किरिबाती – देशाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
- १९६२: द रोलिंग स्टोन्स – यांचा पहिला कार्यक्रम लंडनमधील मार्क्वी क्लबमधे झाला.
- १९६१: धरणफुटी, पुणे – पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुरात किमान २,००० लोकांचे निधन तर १ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले.
- १९२०: पनामा कालवा – औपचारिक उदघाटन झाले.
- १७९९: रणजित सिंग – यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.
- १६७४: मराठा साम्राज्य – शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.