२०२५:सी. पी. राधाकृष्णन— सी. पी. राधाकृष्णन यांना भारताचे १५वे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती म्हणून शपथ घेतली
२०२५:नमो भारत रेल्वे— दिल्ली–मेरठ मार्गावरील नमो भारत रेल्वे ही १६० किमी/ताशी वेगाने धावणारी भारतातील सर्वात वेगवान प्रवासी ट्रेन बनली
२०२२:जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप— ओरियन नक्षत्रात असलेल्या ओरियन नेब्युलाचे पहिले फोटो प्रकशित केले.
२०१३:व्हॉयेजर १ प्रोब— नासाचे व्हॉयेजर १ प्रोब हे आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली असे घोषित केले.
२०११:न्यूयॉर्क, अमेरिका— शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.
२००५:डिस्नेलँड, हाँगकाँग— सुरू झाले.
२००२:मेटसॅट— या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
१९९८:डॉ. जयंत नारळीकर— यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
१९९२:स्पेस शटल एंडेव्हर— प्रक्षेपित केले. नासाचे हे ५०वे शटल मिशन चिन्हांकित आहे.
१९९२:में कॅरोल जेमिसन— अंतराळात जाणाऱ्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन महिला बनल्या
१९९२:मामोरू मोहरी— अमेरिकन स्पेसशिपमध्ये उड्डाण करणारे पहिले जपानी नागरिक बनले
१९९२:स्पेस शटल एंडेव्हर— मार्क ली आणि जॅन डेव्हिस हे अंतराळात जाणारे पहिली विवाहित जोडी बनले.
१९८०:तुर्कस्तान— देशामध्ये लष्करी उठाव.
१९६६:मिथुन ११— नासाच्या जेमिनी कार्यक्रमाचे अंतिम मिशन
१९६२:जॉन एफ. केनेडी— अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, यांनी 'आम्ही चंद्रावर जाणे निवडले' (We choose to go to the Moon) भाषण दिले.
१९६१:आफ्रिकन आणि मालागासी युनियन (AMU)— स्थापना झाली.
१९५९:ल्युना-२— हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.
१९५८:जॅक किल्बी— यांनी टेक्सास इन्स्ट्रुमेंट्समध्ये काम करताना प्रथम कार्यरत इंटिग्रेटेड सर्किटचे प्रात्यक्षिक केले.
१९४५:पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया— कोरियावरील जपानी राजवट संपवून कोरियाचे पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया घोषित करण्यात आले.
१९४३:दुसरे महायुद्ध— बेनिटो मुसोलिनी यांची जर्मन कमांडो सैन्याने नजरकैदेतून सुटका केली.
१९४२:दुसरे महायुद्ध— एडसन रिजची लढाई: ग्वाडालकॅनल मोहिमेदरम्यान लढाईचा पहिला दिवस.
१९३०:विल्फ्रेड ऱ्होड्स— यांनी शेवटचा, १११०वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.
१९१९:ऍडॉल्फ हिटलर— यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.
१८९७:तिराह मोहीम— सारागड ची लढाई: ब्रिटीश सेवेत असलेल्या २१ शीख सैनिकांवर हल्ला करताना दहा हजार पश्तुन आदिवासींपैकी अनेकांचे निधन.
१८५७:कॅलिफोर्निया गोल्ड रश— कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.
१८४८:स्वित्झर्लंड— देशाची फेडरल राज्य म्हणून स्थापना
१६६६:मराठा साम्राज्य— आग्ऱ्याहून सुटका: शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.