२०२२:SAFF U-19 Championship 2022— दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (South Asian Football Federation) अंडर-17 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा नेपाळविरुद्ध विजय.
२०१३:निना दावुलुरी— या भारतीय वंशाच्या पहिल्या मिस अमेरिका बनल्या.
२००८:लेहमन ब्रदर्स— या वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी जाहीर केली.
२०००:ऑलिम्पिक— सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे २७व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू.
१९८१:सँड्रा डे ओ'कॉनर— अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती बनल्या.
१९७८:मुहम्मद अली— तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे पहिले बॉक्सर बनले.
१९६८:झाँड ५— सोव्हिएत संघाच्या अंतराळयानाचे प्रक्षेपण, चंद्राची प्रदक्षिणा करून परत पृथ्वीवर येणारे पहिले अंतराळयान आहे.
१९५९:निकिता क्रुस्चेव्ह— हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते बनले.
१९५४:मर्लिन मन्रो— द सेव्हन इयर इच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मर्लिन मन्रो यांच्या आयकॉनिक स्कर्ट सीनचे चित्रीकरण करण्यात आले.
१९५३:श्रीमती विजयालक्ष्मी पंडित— यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
१९४८:ऑपरेशन पोलो— भारतीय सैन्याने जालना, लातूर, मोमिनाबाद, सुर्यापेट आणि नरकटपल्ली ही शहरे ताब्यात घेतली.
१९४७:कॅथलीन टायफून, जपान— या वादळामुळे जपानमधील कांतो प्रदेशातील किमान १०७७ लोकांचे निधन.
१९४४:दुसरे महायुद्ध— अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट आणि आणि इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल क्यूबेक येथे ऑक्टगॉन परिषदेचा भाग म्हणून भेटले.
१९३५:जर्मनी— देशाने स्वस्तिक असलेला नवीन राष्ट्रध्वज स्वीकारला.
१९३५:जर्मनी— देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.
१९१६:पहिले महायुद्ध— सोम्मेची लढाई: पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर करण्यात आला.
१८२१:— कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन.
१८१२:नेपोलियन बोनापार्ट— यांच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिन जवळ पोहोचले.