१७ सप्टेंबर घटना - दिनविशेष


२०१३: ग्रँड थेफ्ट ऑटो (GTA V) - या विडिओ गेमच्या रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्ध्या अब्ज डॉलर्स (४ हजार करोड रुपये) पेक्षा जास्त कमाई केली.
२००६: फोरपीक माउंटन ज्वालामुखी उद्रेक - हा ज्वालामुखी किमान १० हजार वर्षांतील पहिला उद्रेक होता.
२००१: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज - ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर व्यापारासाठी पुन्हा सुरु करण्यात आले.
१९९१: संयुक्त राष्ट्र - एस्टोनिया, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, लॅटव्हिया, लिथुआनिया, मार्शल बेटे आणि मायक्रोनेशिया संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
१९९१: लिनक्स कर्नल - या प्रोग्रामिंग लँग्वेजची पहिली आवृत्ती (0.01) इंटरनेटवर प्रकाशित झाली.
१९८३: व्हेनेसा विल्यम्स - पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन मिस अमेरिका बनल्या.
१९७६: स्पेस शटल एंटरप्राइझ - नासाने स्पेस शटल एंटरप्राइझचे अनावरण केले.
१९७४: संयुक्त राष्ट्र - बांगलादेश, ग्रेनाडा आणि गिनी-बिसाऊ संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
१९६५: चाविंडाची लढाई - पाकिस्तान आणि भारत यांच्यात झाली.
१९४८: हैदराबाद मुक्तिसंग्राम - हैदराबादच्या निजामाने हैदराबाद राज्यावरील आपले सार्वभौमत्व समर्पण केले आणि भारतीय संघराज्यात सामील झाले.
१९४४: दुसरे महायुद्ध - सोव्हिएत सैन्याने जर्मनी आणि स्वातंत्र्य समर्थक एस्टोनियन युनिट्सविरूद्ध आक्रमण सुरू केले.
१९४४: दुसरे महायुद्ध - सॅन मारिनोची लढाई: मित्र राष्ट्रांनी जर्मन सैन्यावर हल्ला केला.
१९४१: दुसरे महायुद्ध - अँग्लो-सोव्हिएत आक्रमण: सोव्हिएत सैन्याने तेहरानमध्ये प्रवेश केला.
१९४०: दुसरे महायुद्ध - ब्रिटनची लढाई: शरद ऋतूतील हवामानामुळे हिटलरने ऑपरेशन सी लायन पुढे ढकलले.
१९३९: दुसरे महायुद्ध - पोलंडवर सोव्हिएत आक्रमण सुरू झाले.
१९३९: दुसरे महायुद्ध - जर्मन पाणबुडी U-29 ने ब्रिटिश विमानवाहू युद्धनौका एचएमएस करेजियस बुडवली.
१९२८: ओकीचोबी चक्रीवादळ - अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या चक्रीवादळात किमान २५०० लोकांचे निधन.
१९१६: पहिले महायुद्ध - मॅनफ्रेड फॉन रिचथोफेन (द रेड बॅरन) यांनी पहिली हवाई लढाई जिंकली.
१९१४: पहिले महायुद्ध - द रेस टू द सी सुरू.
१९०८: लेफ्टनंट थॉमस सेल्फ्रिज - यांचे ऑर्व्हिल राईट यांच्या सोबत उड्डाण करत असताना झालेल्या अपघातात निधन. ही पहिली विमान अपघाताची घटना आहे.
१८९४: पहिले चीन-जपानी युद्ध - यालू नदीची लढाई: सर्वात मोठी नौदल लढाई.
१८०९: फिनिश युद्ध - स्वीडन आणि रशिया यांच्यात शांतता; फ्रेड्रिक्शमनच्या कराराद्वारे फिनलंडचा प्रदेश रशियाला दिला जाईल.
१७८७: फिलाडेल्फिया, अमेरिका - येथे अमेरिकेच्या राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली.
१७७८: फोर्ट पिटचा तह - अमेरिका आणि मूळ अमेरिकन जमातीमधील हा पहिला औपचारिक करार आहे.
१७७५: अमेरिकन क्रांतिकारक युद्ध - कॅनडावरील आक्रमणाची सुरुवात सेंट जीन फोर्टच्या वेढ्याने झाली.


जानेवारी

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023