१८ नोव्हेंबर घटना
-
२०१५: — टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.
-
१९९३: — दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.
-
१९९२: — ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
-
१९६३: — पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.
-
१९६२: — डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उदघाटन झाले.
-
१९५५: — भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.
-
१९३३: — प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला.
-
१९२८: मिकीमाऊस — वॉल्ट डिस्ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म.
-
१९१८: — लाटव्हियाने आपण रशियापासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
-
१९०५: — लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.
-
१८८२: — अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले.
-
१८०९: — फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.
-
१४९३: — ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पोर्तो रिको हे बेट पहिल्यांदा पाहीले.