१९ सप्टेंबर घटना
-
२०२१: कुंब्रे व्हिएजा ज्वालामुखीचा उद्रेक — ला पाल्माच्या स्पॅनिश कॅनरी बेटावर झाला.
-
२०१७: पुएब्ला भूकंप २०१७ — मेक्सिको मध्ये झालेल्या भूकंपामुळे किमान ३७० लोकांचे निधन तर ६ हजार हुन अधिक लोक जखमी.
-
२००७: युवराजसिंग — हे टी-२० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारे पहिले खेळाडू बनले.
-
२०००: कर्नाम मल्लेश्वरी — यांनी सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवले. असे करणाऱ्या त्या पहिलय भारतीय महिला बनल्या.
-
१९९१: ओत्झी आइसमन — इ.स. पूर्व ३३५० ते ३१०५ दरम्यान जगलेल्या माणसाची नैसर्गिक ममी इटली आणि ऑस्ट्रियाच्या सीमेवर आल्प्स पर्वतरांगेमध्ये सापडले.
-
१९८५: मेक्सिको सिटी भूकंप — भूकंपामुळे हजारो लोकांचे निधन तर सुमारे ४०० इमारती उद्ध्वस्त झाल्या.
-
१९८३: सेंट किट्स आणि नेव्हिस — देशाला स्वातंत्र्य मिळाले.
-
१९८२: पहिले इमोटीकॉन्स — स्कॉट फॅहलमन यांनी पहिल्यांदाच :-) आणि :-( या पहिल्या इमोटीकॉन्सचा वापर केला.
-
१९७८: संयुक्त राष्ट्र — सॉलोमन बेटे संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
-
१९७०: ग्लास्टनबरी फेस्टिव्हल — मायकेल इव्हिस यांनी पहिल्यांदा आयोजित केला.
-
१९५७: प्लंबबॉब रेनियर अणुबॉम्ब — हा पहिला आण्विक स्फोट बनला जो संपूर्णपणे भूगर्भात समाविष्ट होता, त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही.
-
१९५०: कोरियन युद्ध — नाम नदीची लढाई: उत्तर कोरियाच्या सैन्याने केलेला हल्ला परतवून लावला.
-
१९४६: युरोप कौन्सिल — स्थापना झाली.
-
१९४४: दुसरे महायुद्ध — हर्टगेन फॉरेस्टची लढाई: सुरू झाली. पुढे अमेरिकन सैन्याने लढलेली ही सर्वात मोठी वैयक्तिक लढाई ठरेल.
-
१९४४: दुसरे महायुद्ध — मॉस्को युद्धविराम करार: फिनलंड आणि सोव्हिएत युनियन यांच्यात करारावर स्वाक्षरी झाली.
-
१८९३: न्यूझीलंड — देशामध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
-
१८७०: फ्रँको-प्रुशियन युद्ध — पॅरिस शहाराचा वेढा सुरू झाला. आत्मसमर्पण करण्यापूर्वी हे शहर चार महिन्यांहून अधिक काळ टिकून राहीले.
-
१८६८: ला ग्लोरिओसा क्रांती — स्पेनमध्ये सुरू झाली.
-
१७९९: फ्रेंच क्रांतिकारक युद्ध — बर्गनची लढाई: रशियन आणि ब्रिटिशांविरुद्ध फ्रेंच-डच यांचा विजय.
-
१७७७: अमेरिकन क्रांतिकारक युद्ध — साराटोगाची पहिली लढाई: ब्रिटीश सैन्याने कॉन्टिनेंटल आर्मीवर विजय मिळवला.