२०१९:चांद्रयान २, इसरो— अंतराळयानाचे यशस्वी प्रक्षेपण, भारताची दुसरी चंद्र शोध मोहीम सुरु.
१९८३:पोलंड— १३ डिसेंबर १९८१ ला सुरु झालेला मार्शल लॉ अधिकृतपणे रद्द,
१९४४:पोलंड— देशातील कम्युनिस्ट राजवटीचा कालावधी सुरू झाला.
१९४२:— वॉर्सा मधुन ज्यूं लोकांना हद्दपार करणे सुरू झाले.
१९३३:विली पोस्ट— यांनी ७ दिवस, १८ तास आणि ४९ मिनिटांतजगाची पहिली प्रदक्षिणा पूर्ण केली.
१९३१:— फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. या हल्ल्यातून हॉटसन वाचले.
१९०८:लोकमान्य टिळक— ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.
१८९४:पहिली मोटार शर्यत— फ्रान्समध्ये पॅरिस आणि रौएन शहरांदरम्यान झाली.