२३ जानेवारी घटना
-
२००२: — वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण.
-
१९९७: — मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.
-
१९७३: — अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.
-
१९६८: — शीतयुद्ध उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस. प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.
-
१९४३: — दुसरे महायुद्ध ब्रिटिश सैन्याने लिबीयाची राजधानी त्रिपोली शहर जिंकले.
-
१९३२: — प्रभात च्या अयोध्येचा राजा ची हिंदी आवृत्ती अयोध्याका राजा मुंबईत प्रदर्शित झाली.
-
१८४९: — डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर बनल्या.
-
१५६५: — विजयनगर साम्राज्याची अखेर.