२४ फेब्रुवारी घटना - दिनविशेष


२०२२: रुसो-युक्रेनियन युद्ध - रशियाने युक्रेनवर पूर्ण-प्रमाणावर आक्रमण सुरू केले.
२०१०: सचिन तेंडुलकर - एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारे पहिले खेळाडू बनले.
२००८: फिडेल कॅस्ट्रो - ३२ वर्षांनी क्युबा देशाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.
१९९७: रशिया - देशाच्या मीर या अंतराळस्थानात आग लागली.
१९७१: ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक - पक्षाची आपत्कालीन केंद्रीय समितीची बैठक, यात तीन दिवसांपूर्वी अध्यक्ष हेमंथा कुमार बोस यांची हत्या झाल्यामुळे पी. के. मुकिया तेवर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
१९६१: तामिळ नाडू - मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळ नाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
१९५२: कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) - सुरूवात झाली.
१९३८: ड्युपॉन्ट - कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.
१९२०: नॅन्सी एस्टर - संसद सदस्य (एमपी) म्हणून निवडून आल्यानंतर युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
१९२०: नाझी पार्टी (NSDAP) - स्थापना झाली.
१९१८: इस्टोनिया - देशाला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.
१८८१: सेंट पीटर्सबर्गचा तह (१८८१) - चीन आणि रशियाने या करारावर स्वाक्षरी केली.
१८५४: पेनी रेड - हे पहिले छिद्रित टपाल तिकीट वितरणासाठी अधिकृतपणे जारी करण्यात आले.
१८२२: स्वामीनारायण मंदिर, अहमदाबाद - जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे उदघाटन झाले.
१७३९: कर्नालची लढाई - इराणी नादर शाह यांनी भारताचा मुघल सम्राट मुहम्मद शाह यांचा पराभव केला.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024