२४ नोव्हेंबर घटना - दिनविशेष

  • उत्क्रांती दिन

२०००: भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.
१९९८: समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान.
१९९६: इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.
१९९२: कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.
१९७६: तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे
१९७१: डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.
१९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.
१९६३: जॉन एफ. केनेडी यांचा खून करणाऱ्या ली. हार्वे ऑसवाल्ड याचा डॅलस पोलीस स्थानकात जॅक रुबी ने खून केला.
१९४४: दुसरे महायुद्ध ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना.
१८५९: चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पिशिज प्रकाशित केला.
१७५०: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद.
१४३४: थेम्स नदी पूर्णपणे गोठली.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024